Headlines

श्री विशाल गणेश मंदिर व ज्ञानदा प्रतिष्ठान यांच्यावतीने रक्तदान शिबीर संपन्न

रक्तदानाच्या उपक्रमातून गरजू रुग्णांना लाभ – संगमनाथ महाराज युवक ही समाजाची शक्ती आहे, या शक्तीचा धार्मिक, सामाजिक कार्यात सद्उपयोग झाला पाहिजे. यासाठी त्यांना योग्य मार्गदर्शन आणि सामाजिक उपक्रमात सक्रिय केले पाहिजे. ज्ञानदा प्रतिष्ठान हे नेहमीच सामाजिक कार्यातून समाजाला दिशा देण्याचे काम करत आहे. आज रक्तदानासारखा उपक्रम राबविल्याने गरजू रुग्णांना त्यांचा लाभ होणार आहे. अशा उपक्रमांची समाजाला गरज आहे. या उपक्रमात युवकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन आरोग्य सेवेत आपले योगदान द्यावे, असे आवाहन श्री विशाल गणेश देवस्थानचे महंत संगमनाथ महाराज यांनी केले.      श्री विशाल गणेश मंदिर व ज्ञानदा प्रतिष्ठान यांच्यावतीने रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. त्याचे उद्घाटन महंत संगमनाथ महाराज यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी प्रतिष्ठानचे अध्यक्ष सचिन हिरवे, अभय टाक, गणेश राऊत, प्रतिक गिरमे, सचिन आनारसे, केदार फुलसौंदर, गणेश पितळे, निसार शेख, अमोल जाधव आदि उपस्थित होते.      याप्रसंगी प्रतिष्ठानचे अध्यक्ष सचिन हिरवे म्हणाले, आपण समाजाचे काही देणे लागतो, या भावनेतून काम केले पाहिजे. आज प्रत्येकजण बिझी आहे. परंतु चांगली-वाईट वेळ प्रत्येकावर येत असते. अशा परिस्थितीत त्याला मदतीचा हात दिला पाहिजे. रक्ताची गरज ही अत्यावश्यक बाब झाली आहे. रक्तदानाशिवाय त्याला पर्याय नाही. त्यामुळे युवकांनी रक्तदान चळवळी सहभागी झाले पाहिजे. ज्ञानदा प्रतिष्ठानने नेहमीच  सामाजिक उपक्रमांना प्राधान्य देत वृक्षारोपण, गरजूंना मदत, शैक्षणिक साहित्याचे वाटप, अन्नदान त्याचबरोबर दरवर्षी रक्तदानासारखा महत्वाचा उपक्रम राबवित असते. आजच्या रक्तदान शिबीरास युवकांनी दिलेला प्रतिसाद आमचा उत्साह वाढविणार असल्याचे सांगितले.      यावेळी देवस्थानचे अध्यक्ष अ‍ॅड.अभय आगरकर, सचिव अशोकराव कानडे, विश्वस्त विजय कोथिंबीरे, प्रा.माणिकराव विधाते, पांडूरंग नन्नवरे, ज्ञानदा प्रतिष्ठानचे ज्ञानेश्वर बर्वे, शिवाजी पठारे, विश्वसराव चेडे, महेश सोनूले, संदिप दळवी, नामदेव दहिंडे, मधुकर गाडे, स्वप्नील गवळी, शेखर पुंड, जयदीप पादीर, वैभव भोंग, किरण रडे, सविता खंदारे आदि उपस्थित होते.      रक्त संकलनाचे कार्य अर्पण ब्लड बँकेचे भाग्यश्री पवार, सुषमा वैद्य, अशोक मुंडे यांच्यावतीने करण्यात आले.   कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश राऊत यांनी केले तर आभार अभय टाक यांनी मानले.

Read More

उपजिल्हा प्रमुख गिरीश जाधव यांच्या नेतृत्वाखाली ३०० कार्यकर्त्यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेत केला प्रवेश

शिवसेना नेते संजय राऊत यांच्या हस्ते बांधले शिवबंधन अहमदनगर आज नक्षत्र लॉन येथे शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यां मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात मार्गदर्शन करण्यासाठी शिवसेना नेते आणि राष्ट्रीय प्रवक्ता खा. संजय राऊत हे आले होते. या निमित्ताने शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे, स्व. आ. अनिल भैय्या राठोड आणि शिवसेना उपजिल्हा…

Read More

मराठा समाजास आरक्षण जाहीर झाल्याने नगरमध्ये मराठा सेवा संघ व जिल्हा नागरी मराठा पतसंस्थेच्यावतीने जल्लोष सर्वांच्या एकत्रित प्रयत्नातून सुरु असलेल्या लढ्याला यश
– इंजि.सुरेश इथापे

मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी गेल्या 30 वर्षांपासून समाजाचे प्रयत्न सुरु आहेत. यासाठी राज्यभर काढलेले भव्य मोर्चे सरकारने पाहिले, परंतु आरक्षणाबाबत टाळाटाळ केली जात होते. आता यासाठी मनोज जरांगे यांनी मोठा लढा उभा केला. आरक्षणाच्या मुद्यावर त्यांनी 20 जानेवारीपासून मुंबईला पायी मोर्चा काढला या मोर्चाला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत गेल्याने मुंबईच्या दिशेने मोठा मराठा समाज एकवटला…

Read More

मेथीचे दर कोसळल्याने अहमदनगरच्या भाजी मार्केटमध्ये शेतकऱ्याला आपली मेथी अक्षरशः रस्त्यावर फेकून देण्याची वेळ

प्रजासत्ताक दिवस नाही तर शेतकऱ्यांची हत्या दिवस अशी परिस्थिती असल्याचा आरोप शेतकरी वैभव शिंदे यांनी केला आहे अहमदनगर एकीकडे कांद्याचे दर कोसळल्याने व अवकाळी पावसाचे संकट ओढवल्याने शेतकरी हतबल झाला आहे त्यातच काही उत्पन्न मिळावं या अशाने नगदी पिके केली जातात परंतु या नगदी पिकाला देखील भाव मिळत नसल्याने शेतकरी मेटाकुटीला आलाय. मेथीचे दर कोसळल्याने…

Read More

सामाजिक सुरक्षेचे योजना रुपी कवच तळागाळातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवण्यासाठी  शासन प्रयत्नशिल -पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

देशाच्या प्रगतीचा रथ सर्वसामान्य व्यक्तींच्या योगदानामुळेच पुढे जात आहे. समाजातील शेवटच्या घटकाचा सर्वांगिण विकास व्हावा यासाठी सामाजिक सुरक्षेचे योजनारुपी कवच तळागाळातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवण्यासाठी शासनामार्फत यशस्वी प्रयत्न करण्यात येत असल्याचे प्रतिपादन राज्याचे महसूल, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले. भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या ७४ व्या वर्धापन दिनानिमित्त पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर…

Read More

तहसील कार्यालयाच्या नुतन इमारतीमधुन शासनाच्या धोरणांची, योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी व्हावी- पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

नेवासा येथे उभारण्यात आलेल्या तहसील कार्यालयाच्या नूतन इमारतीमधून शासनाच्या धोरणांची, योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी होण्याबरोबरच सर्वसामान्यांची कामे वेळेत मार्गी लागून त्यांची अपेक्षापूर्ती व्हावी, अशी अपेक्षा राज्याचे महसूल, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली.नेवासा येथे तहसील कार्यालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन पालकमंत्री श्री विखे पाटील यांच्या हस्ते आज करण्यात आले.त्याप्रसंगी ते…

Read More

तिळवण तेली समाज ट्रस्टच्यावतीने ‘श्री संत संताजी महाराज पथ’ फलकाचे अनावरण संत संताजी महाराजांच्या कार्याचा खर्‍या अर्थाने गौरव – भगवान फुलसौंदर

नगरमध्ये तेली समाज मोठ्या प्रमाणात आहे, नगरच्या विविध क्षेत्रात कार्यरत राहून शहराच्या विकासात योगदान देत आहेत. विविध उपक्रमातून समाजाचे चांगले संघटन निर्माण झाले. समाजातील प्रत्येक घटकाची उन्नत्तीसाठी राबवित असलेल्या उपक्रमातून समाजोन्नत्तीचे काम होते. तेलीखुंटचे नामकरण आता ‘ संत श्री संताजी महाराज पथ’ असे करण्यात आले आहे. यातून संत संताजी महाराजांच्या कार्याचा खर्‍या अर्थाने गौरव होणार…

Read More

रिपाईच्या नवीन जिल्हाध्यक्षाची निवड पक्षाच्या घटनेला डावलून व बेकायदेशीर -सुनिल साळवे

नवीन जिल्हाध्यक्ष निवडीचे कोणतेही अधिकृत पत्र नसल्याचा पक्षाचे केंद्रीय निवडणूक निर्णय अधिकारी बर्वे यांचा खुलासा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाच्या केंद्रीय निवडणूक निर्णय अधिकारी ॲड. बी.के. बर्वे यांच्याकडे सादर करण्यात आलेल्या कार्यकारणीची मुदत संपलेली नाही. नवीन जिल्हाध्यक्ष पदाची झालेली निवड ही पक्षाच्या घटनेला व नियमाला डावलून करण्यात आली असून, कार्यरत जिल्हाध्यक्षांनी राजीनामा दिलेला नसताना,…

Read More


श्री समर्थ ॲकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी राबवले ” स्वच्छता हिच सेवा ” अभियान !

पारनेर               दिनांक २० जानेवारी २०२४ रोजी श्री समर्थ अकॅडेमी संचालित श्री समर्थ पॉलीटेकनिक व श्री समर्थ इंग्लिश मेडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी २२ जानेवारी रोजी अयोध्या येथे होणाऱ्या प्रभु श्री रामचंद्रांच्या प्राणप्रतिष्ठेच्या पार्शवभूमीवर म्हसणे गाव व पळवे येथील मंदिरांची साफ सफाई केली. या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सामाजिक शिक्षणाचे धडे मिळाले तसेच परिसर स्वच्छ ठेवणे ही गोष्ट…

Read More

आ.लंके यांच्या प्रयत्नातून व वेसदरे ग्रामस्थांच्या सहभागातून स्मशानभुमीचा काया पालट !

राणी लंके यांच्या हस्ते झाले भुमीपुजन पारनेर         वेसदरे येथील स्मशान भुमी सुशोभीकरणाचा प्रश्न अनेक दिवसापासून प्रलंबित असल्या कारणाने ग्रामस्थांनी आमदार लंके यांच्याकडे याबाबत पत्र व्यवहार करत मागणी केली .सदर स्मशानभूमीचे सुशोभीकरण व क्राँक्रीटीकरण होण्यासाठी पारनेर नगर विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांनी १५,००,०००/- पंधरा लक्ष रुपयांचा भरवी निधी दिला.परंतु वेसदरे ग्रामस्थांच्या अपेक्षाप्रमाणे सदर…

Read More