मराठा समाजास आरक्षण जाहीर झाल्याने नगरमध्ये मराठा सेवा संघ व जिल्हा नागरी मराठा पतसंस्थेच्यावतीने जल्लोष सर्वांच्या एकत्रित प्रयत्नातून सुरु असलेल्या लढ्याला यश
– इंजि.सुरेश इथापे

मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी गेल्या 30 वर्षांपासून समाजाचे प्रयत्न सुरु आहेत. यासाठी राज्यभर काढलेले भव्य मोर्चे सरकारने पाहिले, परंतु आरक्षणाबाबत टाळाटाळ केली जात होते. आता यासाठी मनोज जरांगे यांनी मोठा लढा उभा केला. आरक्षणाच्या मुद्यावर त्यांनी 20 जानेवारीपासून मुंबईला पायी मोर्चा काढला या मोर्चाला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत गेल्याने मुंबईच्या दिशेने मोठा मराठा समाज एकवटला होता. अखेर सरकारला मराठा समाजाच्या मागण्यांचा विचार करण्यास भाग पाडले आणि आज मराठा समाजाच्या आरक्षणाचा अध्यादेश काढण्यात आला. मराठा समाजासाठी ही मोठी गोष्ट आहे. गेल्या वर्षभरापासून सर्वांच्या एकत्रित प्रयत्नातून सुरु असलेल्या लढामुळे शासनाला मराठा आरक्षणा संदर्भात शिंदे समिती, कुणबी नोंदी, मराठा समाजाचे सर्व्हेक्षण अशा विविध सरकारी यंत्रणेमार्फत युद्धपातळीवर सुरु आहे. मुंबई मोर्चाने सरकारला आरक्षणासाठी मराठा समाज किती आक्रमक आहे ते आरक्षण किती गरजेचे आहे, हे मोर्चाला मिळालेल्या प्रतिसादातून दिसून आले. त्यामुळे सरकारने हा अध्यादेश काढून आरक्षण देण्याचे मान्य केले आहे. हा मराठा समाज बांधवांच्या एकजुटीचा विजय असल्याचे प्रतिपादन मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष इंजि.सुरेश इथापे यांनी केले.

मराठा समाजास आरक्षण जाहीर झाल्याने नगरमध्ये मराठा सेवा संघ व जिल्हा नागरी मराठा पतसंस्थेच्यावतीने जल्लोष करुन वस्तू संग्रहालय येथील राजमाता जिजाऊ व शहाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष इंजि.सुरेश इथापे, पतसंस्था संचालक सतीश इंगळे, उदय अनभुले, बापूराजे भोसले, श्रीपाद दगडे, शशिकांत भांबरे, शिवजित डोके, विष्णू भुतकर, सचिन जगताप, निलेश म्हसे, राजेंद्र कर्डिले, ओम इंगळे आदि उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *