मेथीचे दर कोसळल्याने अहमदनगरच्या भाजी मार्केटमध्ये शेतकऱ्याला आपली मेथी अक्षरशः रस्त्यावर फेकून देण्याची वेळ

प्रजासत्ताक दिवस नाही तर शेतकऱ्यांची हत्या दिवस अशी परिस्थिती असल्याचा आरोप शेतकरी वैभव शिंदे यांनी केला आहे

अहमदनगर

एकीकडे कांद्याचे दर कोसळल्याने व अवकाळी पावसाचे संकट ओढवल्याने शेतकरी हतबल झाला आहे त्यातच काही उत्पन्न मिळावं या अशाने नगदी पिके केली जातात परंतु या नगदी पिकाला देखील भाव मिळत नसल्याने शेतकरी मेटाकुटीला आलाय.
मेथीचे दर कोसळल्याने अहमदनगरच्या भाजी मार्केटमध्ये शेतकऱ्याला आपली मेथी अक्षरशः रस्त्यावर फेकून देण्याची वेळ आली आहे… युवा शेतकरी वैभव शिंदे यांना मेथीच्या जुड्या रस्त्यावर फेकून देत तीव्र संताप व्यक्त केलाय… वैभव शिंदे यांनी अहमदनगरच्या भाजी मार्केटमध्ये चार हजार मेथीच्या जुड्या आणल्या होत्या… या मेथीला केवळ 50 पैसे जुडी प्रमाणे दर मिळाला आहे… यामध्ये त्यांचे गाडी भाडे देखील निघत नसल्याने त्यांनी मेथी रस्त्यावरती फेकून देत तीव्र संताप व्यक्त केला… आज देशात प्रजासत्ताक दिन साजरा होत आहे , मात्र प्रजासत्ताक नाही तर शेतकरी हत्या दिवस अशीच काहीशी परिस्थिती असल्याची तीव्र भावना वैभव शिंदे यांनी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *