भिंगार अर्बन बँकेच्या भृंगऋषी पॅनेलच्यावतीने माळीवाडा परिसरातून प्रचारफेरीभृंगऋषी पॅनेलच्या प्रचारफेरीस उत्स्फुर्त प्रतिसादाने विजय निश्चित – अनिलराव झोडगे

भिंगार अर्बन बँकेच्या भृंगऋषी पॅनेलच्यावतीने माळीवाडा परिसरातून प्रचारफेरी

भृंगऋषी पॅनेलच्या प्रचारफेरीस उत्स्फुर्त प्रतिसादाने विजय निश्चित – अनिलराव झोडगे

भिंगार बँक ही सर्वसामान्यांची बँक म्हणून सर्वांना परिचित आहे, बँकेने काळाची पावले ओळखून वेळोवेळी आधुनिकतेचा स्विकार करुन ग्राहकाभिमुख सेवा देत सर्वांचा विश्वास संपादन केला. संचालक मंडळाच्या पारदर्शी कारभारामुळे बँकेला अनेक देश व राज्य पातळीवरील पुरस्कार मिळाले आहे. निवडणुक हा प्रक्रियेचा भाग असल्याने ही फक्त औपचारिकता आहे. सर्व सभासद हे भृंगऋषी पॅनेलच्या मागे खंबीरपणे उभे असून, त्यामुळे पॅनेलचे सर्व उमेदवार मोठ्या मताधिक्यांने विजयी होतील, असा विश्वास आहे. माळीवाडा व नगर शहर परिसरातील मतदार हे भृंगऋषी पॅनेलच्या प्रचार फेरीस मोठा प्रतिसाद देत आहेत, त्यामुळे आमचा विजय निश्चित आहे, असा विश्वास पॅनेलचे प्रमुख अनिलराव झोडगे यांनी केले.

     भिंगार अर्बन बँकेच्या भृंगऋषी पॅनेलच्यावतीने माळीवाडा परिसरातून प्रचारफेरीचा शुभारंभ शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणेश मंदिरात आरती करुन करण्यात आला. याप्रसंगी पॅनेल प्रमुख अनिलराव झोडगे व किसनराव चौधरी, कैलास खरपुडे, विष्णू फुलसौंदर, अमोल धाडगे, राजेंद्र पतके, माधव गोंधळे, महेश झोडगे, रुपेश भंडारी, कैलास दळवी, कैलास रासकर, एकनाथ जाधव, नामदेव लंगोटे, तिलोत्तमा करांडे, अनिता भुजबळ आदिंसह  मंदिराचे पुजारी संगमनाथ महाराज, उपाध्यक्ष पंडितराव खरपुडे, अशोकराव कानडे, विश्वस्त गजानन ससाणे,माणिकराव विधाते आदिंसह श्यामराव व्यवहारे, अनिल बोरुडे, अशोकराव कापरे, विश्वनाथ राऊत, बाबासाहेब गिरवले, बजरंग भुतारे, अशोकराव रसाळ, राजेंद्र फुलसौंदर, सुंदर भंडारी, संतोष म्हस्के, मिनाताई सत्रे, शिवाजीराव बनकर, निलेश जाधव, शरद शिंदे, आर.डी.मंत्री, सुशिल कदम, विनायक कोके, छबुनाना जाधव, संतोष धाडगे, पोपटराव शिंदे, रामदास कानडे, मनेष साठे, अर्जुनराव बोरुडे, बाबा जाधव आदि उपस्थित होते.

     याप्रसंगी किसनराव चौधरी म्हणाले, भिंगार बँकेला मोठी ऐतिहासिक परंपरा आहे. बँकिंग क्षेत्रात अनेक बदल होत असतांना, भिंगार बँकेच्या सर्व संचालकांनी चांगला कारभार केल्याने आज बँक चांगल्या स्थितीत आहे. यात सभासद, ठेवीदार, कर्जदार यांचे मोठे योगदान राहिले आहे. संचालक मंडळाच्या दुरदृष्टीने बँकेची प्रगतीची घौडदौड अशीच पुढे सुरु राहणार आहे आणि आम्हाला पुन्हा मतदार भरघोस मतांनी निवडून देणार असल्याचे सांगिले.

     यावेळी माळीवाडा परिसरातून पॅनेलच्या उमेदवारांनी प्रचार फेरी काढून मतदारांच्या गाठी-भेटी घेत मतदान करण्याचे आवाहन केले. यावेळी परिसरातील मतदार व समर्थक सहभागी झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *