शिवसेना (ठाकरे गट) च्यावतीने हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन

हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी दीर्घकाळ मराठी जनतेच्या हृदयावर राज्य केले – संभाजी कदमनगर – हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखे राज्याच्या राजकारणात इतका दिर्घकाळ एखाद्या राजकीय पक्षाचे नेतृत्व अन्य कुठल्याही राजकीय नेत्याने केले नाही हे सत्य आहे. आपल्या निर्भिड, बेधडक व सडेतोडपणा हे त्यांच्या अंगी असलेल्या गुणांमुळे तसेच प्रेमळ व तितकाच मायेचा आधार देणार्‍या स्वभावासाठी शिवसैनिक आपले दैवत मानत. त्यांचा शद्ब म्हणजे शब्द असत. त्यामुळे इतका दीर्घकाळ त्यांनी मराठी जनतेच्या हृदयावर राज्य केले. असा नेता पुन्हा होणे नाही. आयोध्येत श्रीराम मंदिर निर्माण व्हावे, ही मनापासून इच्छा होती, त्यासाठीच्या आंदोलनात शिवसैनिकांना सहभागी होण्याचे आदेश दिले होते. बाबरी मस्ज़िद पाडल्यानंतर ‘शिवसैनिकांनी पडली असल्यास मला अभिमान आहे’ असे उद्गार काढले होते. आज आयोध्येत श्रीराम मंदिर निर्माण होऊन प्राणप्रतिष्ठापणा झाली, हा क्षण पाहण्यासाठी ते हवे होते, असे प्रतिपादन शिवसेना शहरप्रमुख संभाजी कदम यांनी केले.

शिवसेना (ठाकरे गट) च्यावतीने हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवालय येथे त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी शिवसेना शहरप्रमुख संभाजी कदम, माजी महापौर भगवान फुलसौंदर, युवा सेना सहसचिव विक्रम राठोड, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, संजय शेंडगे, माजी महापौर रोहिणी शेंडगे, सुरेखा कदम, पुष्पाताई बोरुडे, स्मिता अष्टेकर, आशा निंबाळकर, अरुणा गोयल, लता पठारे, गिरिष जाधव, योगिराज गाडे, शाम नळकांडे, सचिन शिंदे, परेश लोखंडे, संग्राम कोतकर, अशोक दहिफळे, सुरेश क्षीरसागर, संदिप दातरंगे, श्रीकांत चेमटे, अरुण झेंडे, दिपक भोसले, संतोष डमाळे, गौरव ढोणे, अंबादास शिंदे, गिरिष हांडे, कैलास शिंदे, जालिंदर वाघ, अण्णा घोलप आदिंसह शिवसैनिक उपस्थित होते. तसेच यावेळी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.

याप्रसंगी भगवान फुलसौंदर म्हणाले, शिवसेना हा पक्ष सर्वसामान्यांचा पक्ष आहे. 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण हे बाळासाहेब ठाकरे यांचे तत्व शिवसैनिक राबवतात. त्यामुळे सर्वसामान्यांना न्याय देण्याचेच काम पक्षाच्यावतीने करण्यात येत असल्याचे सांगितले.

यावेळी विक्रम राठोड म्हणाले, हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाला प्रतिष्ठा मिळवून देण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यामुळेच आज शिवसैनिक ताठ मानेने उभा आहे. स्व.अनिलभैय्या राठोड यांच्यावर त्यांचे विशेष प्रेम होते.

नगर – हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखे राज्याच्या राजकारणात इतका दिर्घकाळ एखाद्या राजकीय पक्षाचे नेतृत्व अन्य कुठल्याही राजकीय नेत्याने केले नाही हे सत्य आहे. आपल्या निर्भिड, बेधडक व सडेतोडपणा हे त्यांच्या अंगी असलेल्या गुणांमुळे तसेच प्रेमळ व तितकाच मायेचा आधार देणार्‍या स्वभावासाठी शिवसैनिक आपले दैवत मानत. त्यांचा शद्ब म्हणजे शब्द असत. त्यामुळे इतका दीर्घकाळ त्यांनी मराठी जनतेच्या हृदयावर राज्य केले. असा नेता पुन्हा होणे नाही. आयोध्येत श्रीराम मंदिर निर्माण व्हावे, ही मनापासून इच्छा होती, त्यासाठीच्या आंदोलनात शिवसैनिकांना सहभागी होण्याचे आदेश दिले होते. बाबरी मस्ज़िद पाडल्यानंतर ‘शिवसैनिकांनी पडली असल्यास मला अभिमान आहे’ असे उद्गार काढले होते. आज आयोध्येत श्रीराम मंदिर निर्माण होऊन प्राणप्रतिष्ठापणा झाली, हा क्षण पाहण्यासाठी ते हवे होते, असे प्रतिपादन शिवसेना शहरप्रमुख संभाजी कदम यांनी केले.

शिवसेना (ठाकरे गट) च्यावतीने हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवालय येथे त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी शिवसेना शहरप्रमुख संभाजी कदम, माजी महापौर भगवान फुलसौंदर, युवा सेना सहसचिव विक्रम राठोड, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, संजय शेंडगे, माजी महापौर रोहिणी शेंडगे, सुरेखा कदम, पुष्पाताई बोरुडे, स्मिता अष्टेकर, आशा निंबाळकर, अरुणा गोयल, लता पठारे, गिरिष जाधव, योगिराज गाडे, शाम नळकांडे, सचिन शिंदे, परेश लोखंडे, संग्राम कोतकर, अशोक दहिफळे, सुरेश क्षीरसागर, संदिप दातरंगे, श्रीकांत चेमटे, अरुण झेंडे, दिपक भोसले, संतोष डमाळे, गौरव ढोणे, अंबादास शिंदे, गिरिष हांडे, कैलास शिंदे, जालिंदर वाघ, अण्णा घोलप आदिंसह शिवसैनिक उपस्थित होते. तसेच यावेळी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.

याप्रसंगी भगवान फुलसौंदर म्हणाले, शिवसेना हा पक्ष सर्वसामान्यांचा पक्ष आहे. 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण हे बाळासाहेब ठाकरे यांचे तत्व शिवसैनिक राबवतात. त्यामुळे सर्वसामान्यांना न्याय देण्याचेच काम पक्षाच्यावतीने करण्यात येत असल्याचे सांगितले.

यावेळी विक्रम राठोड म्हणाले, हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाला प्रतिष्ठा मिळवून देण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यामुळेच आज शिवसैनिक ताठ मानेने उभा आहे. स्व.अनिलभैय्या राठोड यांच्यावर त्यांचे विशेष प्रेम होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *