केशरी प्रतिष्ठान व भाजीपाला आडते व्यापार्यांच्यावतीने मार्केट यार्ड येथे महाप्रसादाचे वाटप

श्रीराम मंदिर निर्माण झाल्याने उत्साहाचे वातावरण-सुरेश लालबागे
नगर – 500 वर्षांचा वनवास आज संपला असून, आयोध्येत प्रभु श्रीरामचे मंदिर निर्माण होऊन आज त्यात रामलल्लाची प्रतिष्ठापना होत आहे. यासारखी आनंददायी घटना नाही. हा क्षण ऐतिहासिक सुवर्णक्षराने लिहिला जाणार आहे. करोड भारतीयांच्या इच्छ असलेली श्रीराम मंदिर आज निर्माण होत आहे, यानिमित्त देशभर मोठे उत्साहाचे वातावरण आहे. या अभुतपूर्व सोहळ्यानिमित्त संपूर्ण देशभर उत्साहाचे वातावरण आहे, नगरमध्येही विविध कार्यक्रमांचे आयोजन होत आहे. मार्केंट यार्ड येथे श्रीरामचंद्रांचे पूजन करुन भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन केले आहे. तसेच श्रीराम मंदिरा कार्यात योगदान देणार्या कारसेवकांचा ही सन्मान करुन त्याच्या प्रति कृतज्ञता व्यक्त केली असल्याचे सुरेश लालबागे यांनी सांगितले.
प्रभु श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त केशरी प्रतिष्ठान, भाजीपाला आडते व्यापारी असोसिएशन यांच्यावतीने मार्केट यार्ड भाजीपाला विभाग येथे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमास सुरेश लाबागे, अध्यक्ष अशोक लोटे, अध्यक्ष नंदकिशोर शिकारे, राहुल जाधव, विलास तिवारी, सुनिल लोंढे, कल्याण वाळके, निलेश बडे, निलेश मगर, पंकज कर्डिले, अशोक निमसे, वशिम बागवान, संतोष गोंधळे, अगरकर मामा, अमित भोर, गणेश खेडकर आदिंसह शेतकरी मित्र मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
प्रारंभी प्रभु श्रीराम प्रतिमा पूजन करण्यात आले. यावेळी कारसेवक अनिल सबलोक यांचा सन्मान करण्यात आला. परिसरात आकर्षक सजावट करण्यात आली होती. रांगोळी, रोषणाई, पतका, स्पिकरवर श्रीरामची गाणी यामुळे संपूर्ण वातावरण राममय होऊन गेले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *