प्रभाग क्र.12 मधील मेहेर कॉलनी येथील डांबरीकरण कामाचा शुभारंभ

विकास कामे मार्गी लागल्याने नागरिकांमध्येही समाधान
– बाळासाहेब बोराटे

नगर – गेल्या पाच वर्षांत प्रभागातील प्रत्येक भागातील प्रश्नांना प्राधान्य देत ते सोडविण्याचा प्रयत्न केला आहे. प्रभागातील ड्रेनेज लाईन, पिण्याची पाण्याची लाईन, रस्त्यांचे काँक्रीटीकरण, डांबरीकरण, स्ट्रीट लाईट अशा मुलभुत सुविधा नागरिकांना पुरविण्यात आल्या आहेत. नागरिकांचे प्रश्न सुटावेत, यासाठी विविध निधीच्या माध्यमातून कामे मार्गी लागल्याने नागरिकांमध्येही समाधान आहे. आपला प्रभाग समस्यामुक्त होण्यासाठी आपण कायम प्रयत्नशील राहीलो. तसेच प्रलंबित कामांसाठीही पाठपुरावा करण्यात येत असून, ती कामेही पुढील काळात मार्गी लागतील. आज शुभारंभ होत असलेल्या डांबरीकरण कामामुळे या भागातील नागरिकांची मोठी सोय होणार आहे. सध्या कार्यकाळ संपला असला तरी नागरिकांच्या सेवेत आपण कायम राहणार आहोत, असे प्रतिपादन माजी नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांनी केले.

प्रभाग क्र.12 मधील मेहेर कॉलनी येथील डांबरीकरण कामाचा शुभारंभ माजी नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांच्या हस्ते झाला. याप्रसंगी परेश लोखंडे, अजित गुगळे, आशिष मुथा, शैलेंद्र पाचपुते, सुर्यकांत धोका, पारस धोका, नरेंद्र पटवा, विलास गांधी, बबलू चुग आदि उपस्थित होते.

याप्रसंगी परेश लोखंडे म्हणाले, प्रभागाच्या सर्वांगिण विकासासाठी सर्वोतोपरि प्रयत्न केले गेल्याने प्रत्येक भागात चांगली कामे झाली आहे. नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी कायम तत्पर राहत कामांना प्राधान्य दिले. प्रत्येक भागात गरजेनुसार कामे होत गेल्याने एक आदर्श प्रभाग निर्माण झाला आहे. कामांच्या माध्यमातून नागरिकांशी संपर्क कायम राहील, असा विश्वास व्यक्त केला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अजित गुगळे यांनी केले तर आभार आशिष मुथा यांनी मानले. बर्‍याच दिवसाचा रस्त्याच्या प्रश्न मार्गी लागल्याने परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त करत नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांना धन्यवाद दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *