नगरसेवक प्रशांत गायकवाड यांच्या प्रयत्नातून प्रभाग क्र.15 मधील आदर्श कॉलनीतील ड्रेनेज लाईन कामाचा शुभारंभ

नागरिकांच्या प्रश्नांसाठी आम्ही कायम कार्यरत राहू

-प्रशांत गायकवाड



     नगर –    गेल्या पाच वर्षांपासून प्रभाग 15 मधील विविध माध्यमातून निधी उपलब्ध करुन देत विकास कामे मार्गी लावली आहेत. आदर्श कॉलनी भागातील नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घेतला असून, ड्रेनेज लाईन कामाचा आज शुभारंभ होत असून, पुढील काळात इतर कामेही मार्गे लावण्यात येतील. नागरिकांचे प्रश्न सुटावेत, यासाठी आम्ही कायम प्रयत्नशील राहिलो आहे. आता कार्यकाळ संपला असला तरी अनेक कामे मंजुर केलेली आहेत, ती टप्प्याटप्प्याने पुर्ण केली जातील. नागरिकांच्या प्रश्नांसाठी आपण कायम कार्यरत राहू, असे प्रतिपादन नगरसेवक प्रशांत गायकवाड यांनी केले.

     नगरसेवक प्रशांत गायकवाड यांच्या प्रयत्नातून प्रभाग क्र.15 मधील स्टेशनरोड, आदर्श कॉलनी, स्वामी समर्थ मंदिर परिसरातील ड्रेनेज लाईन कामाचा शुभारंभ ज्येष्ठ नागरिक वसंतलाल फिरोदिया यांच्या हस्ते झाला. याप्रसंगी दत्ता जाधव, दिपक खैरे, संतोष शर्मा, अभय कोठारी, अतुल शिंगवी, राजु आंधळे, धिरज फिरोदिया, सागर दोलारे, संदेश चुंबाळकर, बाळू गुगळे, दिनेश बोरा, विरेंद्र शिंदे, सचिन सप्रे, सोमनाथ रोकडे, आकाश निर्भवने, भिसे आदि उपस्थित होते.

     यावेळी दत्ता जाधव म्हणाले, नागरिकांच्या सोयी-सुविधा पुरविण्यासाठी आम्ही कटीबद्ध असून, त्यासाठी विविध निधीतून कामे मार्गी लावण्याचा प्रयत्न केला आहे. नागरिकांच्या सहकार्याने मुलभुत सुविधा चांगल्या पद्धतीने पुरविण्यात येतील, असे आश्वासित केले.

     याप्रसंगी दिपक खैरे म्हणाले, प्रभाग क्र.15 हा प्रभाग मोठा असल्याने विकास कामे करतांना अनेक अडचणी येत परंतु आम्ही नागरिकांच्या प्रश्नांसाठी प्राधान्य देत, विविध विकास कामांच्या माध्यमातून त्यांना सुविधा देण्याचा प्रयत्न केला असल्याचे सांगितले.

     कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आकाश निर्भवणे यांनी केले तर आभार सोमनाथ रोकडे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *