अखेर आमदार लंकेच्या हातून नगरदक्षिणेत तुतारी वाजणार?



राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार निलेश लंके यांनी मागील आठवड्यामध्ये चार दिवस शिवपुत्र संभाजी या महानाट्याचा आयोजन केलं होतं. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे हे या महानाट्यात छत्रपती संभाजी राजे यांच्या प्रमुख भूमिकेत होते.

महानाट्याच्या समारोप प्रसंगी खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी  केलेल्या भाषणात त्यांनी आमदार निलेश लंके यांनी तुतारी हातात घेऊन दक्षिणेतून निवडणूक लढवावी असे संकेत दिले होते त्यावर आज खऱ्या अर्थाने शिक्का मोर्तब होत असल्याचे दिसू देत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार निलेश लंके हे आज पुणे येथे होणाऱ्या एका कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये शरद पवार गटांमध्ये प्रवेश करणार असून.
येणाऱ्या काळात उपमुख्यमंत्री अजित पवार यांना रामराम ठोकून आमदार निलेश लंके आपल्या हातातील घड्याळ काढून तुतारी हातात घेणार असल्याचे चित्र स्पष्ट झालेलं आहे.
त्यामुळे अहमदनगर दक्षिण मध्ये येणारी विधानसभेची निवडणूक ही प्रामुख्याने महाराष्ट्रामध्ये लक्षवेधी ठरणार आहे कारण भाजपचे खासदार सुजय विखे व राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांच्यातील राजकीय वैर सर्व जिल्ह्याला सुपरीचीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *