तोफखाना पोलीस निरीक्षकांची धडक कारवाई

तोफखाना पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांनी पकडला 34 किलो गांजा

काल तोफखाना पोलीस निरीक्षक श्री आनंद कोकरे यांना गुप्त माहीती मिळाली की, एक इसम हा भिंगारदिवे मळा, मातोश्री हॉटेल समोर , अहमदनगर येथे एका घरामध्ये मनोव्यापारावर परीणाम करणारे गांजा हा मादक पदार्थ विक्री करण्याचे उद्देशाने जवळ बाळगुन आहे. अशी बातमी मिळालेवरुन त्यांनी सदर ठिकाणी छापा टाकुन आरोपीनामे अमोल मदन सदाफुले वय 34 वर्षे रा.मानकर गल्ली, भाजीमार्कट शेजारी, दिल्लीगेट ता जि अहमदनगर हल्ली रा. दातरंगे मळा, वारुळाचा मारुती जवळ, ता जि अहमदनगर हल्ली रा. दातरंगे मळा, वारुळाचा मारुती जवळ, ता जि अहमदनगर हा विक्री करण्याच्या उद्देशाने 34 किलो गांजा , प्रत्येकी दोन किलो वजनाचे पाकिट असे एकुण 17 पाकिट मनोव्यापारावर परीणाम करणारा हिरवट रंगाचा ओलसर उग्र वास येत असलेला गांजा व चारचाकी कार, डिजीटल वजनकाटा, व दोन बॅग असे एकुण 12,63,000/- रु किं.च्या मुद्देमालासह अटक केली असुन पो कॉ सुमीत गवळी याने दिलेल्या फिर्यादी वरुन तोफख्राना पोस्टे गु र नं – 122/2024 NDPS कायदा कलम 8 (क), 20 ( ब ) ii (क) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन सदर गुन्हयाचा पुढील तपास पो.उप.निरी. सचिन रणशेवरे हे करत आहेत.
सदरची कारवाई ही मा. श्री राकेश ओला, पोलीस अधीक्षक सो,अहमदनगर, मा.श्री प्रशांत खैरे, अपर पोलीस अधीक्षक सो, अहमदनगर, मा.श्री हरीष खेडकर सो, उप विभागीय पोलीस अधिकारी सो, नगर शहर विभाग यांचे मार्गदर्शनाखालील पोनि श्री आनंद कोकरे, सपोनि श्री नितीन रणदिवे, पो.उप.निरी श्री सचिन रणशेवरे, पोहेकॉ दत्तात्रय जपे, पोहेकॉ सुनिल शिरसाट, पोहेकॉ भानुदास खेडकर, पोहेकॉ दिनेश मोरे, पोहेकॉ सुधिर खाडे, पोहेकॉ अहमद इनामादार, पोना. संदिप धामणे, पोना. वसीम पठाण, पोकॉ सुमीत गवळी,पोकॉ सतीष त्रिभुवन, पोकॉ सतीष भवर, पो.कॉ दत्तात्रय कोतकर, पो.कॉ शिरीष तरटे, पोकॉ बाळासाहेब भापसे, यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *