जन आधार सामाजिक संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन.


आढाव दांपत्याच्या हत्येची सखोल चौकशी करुन वकील संरक्षण कायद्याची तातडीने अंमलबजावणी करण्याची मागणी.
या गुन्ह्यात सरकारी वकील म्हणून उज्वल निकम यांची नेमणूक करण्याची मागणी. अहमदनगर
राहुरी तालुक्यातील मानोरी गावातील, वकील राजाराम आढाव तसेच त्यांच्या पत्नी अँड.मनीषा यांची निर्घृण हत्या करण्यात आली. त्यामध्ये पोलिसांनी काही आरोपींना अटक देखील केली आहे. पोलिसांनी पकडलेल्या आरोपींची यापूर्वीची देखील गुन्हेगारी पार्श्वभूमी असून ते सराईत गुन्हेगार असल्याचे स्पष्ट दिसत आहे. त्यांनी या पूर्वी देखील ३०२ सारखे गंभीर गुन्हे केलेले आहेत, त्यात त्यांना शिक्षा न झाल्याने त्यांचे मनोबल वाढून यावेळी त्यांनी थेट वकील दाम्पत्यांनाच टार्गेट करत त्यांची किडनेपिंग करत विहिरीत पायाला दगड बांधून हत्या केली. यात घात पात, खंडणी की सुपारी देऊन वकील दामपत्याची हत्या करण्यात आली, याबाबत वेगवेगळ्या लोकांचे वेगवेगळे मत मतांतर आहे. परंतु या आरोपींचा आणि वकील दांपत्यांचा यापूर्वी कुठल्याही प्रकारे संबंध आलेला नसल्याने या घटनेमागचा मास्टरमाईंड कोणीतरी वेगळाच व्यक्ती आहे. आणि तो शोधुन काढण्यासाठी महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी तसेच मुख्यमंत्र्यांनी एक विशेष पथक या गुन्ह्याच्या सखोल चौकशीसाठी नेमावे तसेच सदर गुन्ह्याचा पुढील तपास हा महाराष्ट्र राज्याचे ज्येष्ठ विधी तज्ञ सरकारी वकील म्हणून अँड. उज्वल निकम यांच्याकडे द्यावा जेणेकरून या वकील दाम्पत्यांना न्याय मिळुन आरोपींना फाशीची शिक्षा ठोठावली जाईल व यापुढे कुठल्याही आरोपीच्या विकृत बुद्धीमध्ये वकील बांधवांना टार्गेट करण्याची किंवा त्यांच्यावर हल्ला करण्याची ताकद होणार नाही. व वारंवार यापूर्वी देखील अनेक वकील बांधवांवर अनेक विकृत आरोपींनी कडून हल्ले झालेले आहेत. त्यामुळे यापुढे अशा प्रकारच्या गुन्हेगारांना चाप बसण्यासाठी तसेच समाजाला न्याय देणाऱ्या वकील बांधवांच रक्षण करण्यासाठी वकिलांसंदर्भात तयार केलेल्या वकील संरक्षण कायद्याची तातडीने अंमलबजावणी करण्याच्या मागणीसाठी निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र कुमार पाटील यांना निवेदन देताना जन आधार सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश पोटे समवेत महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष दीपक गुगळे, सचिव अमित गांधी, शहर अध्यक्ष शहानवाज शेख, युवक शहर अध्यक्ष शहबाज शेख, अक्षय पठारे, ईशान शेख, सचिन फल्ले आदीसह पदाधिकारी उपस्थित होते….

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *