भिंगार अर्बन बँक निवडणुकीत अनिलराव झोडगे व किसनराव चौधरी यांच्या नेतृत्वाखालील भृंगऋषी पॅनेलचे सर्वच उमेदवार विजय

भृंगऋषी पॅनेलचे 15 पैकी 15 उमेदवार मोठ्या मतांनी विजयी झाले

भिंगार अर्बन बँकेवर भृंगऋषी पॅनेलचे सर्व उमेदवार मोठ्या मताधिक्क्यांनी विजयी झाले. भिंगार अर्बन बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीचे रविवारी मतदान झाले. यामध्ये 67 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. एकूण 6989 पैकी 4749 जणांनी मतदान केले. या निवडणुकी विद्यमाने चेअरमन अनिलराव झोडगे व व्हाईस चेअरमन किसनराव चौधरी यांच्या नेतृत्वाखाली भृंगऋषी पॅनेल व माजी चेअरमन स्व.गोपाळराव झोडगे यांच्या पत्नी शारदाताई झोडगे यांच्या नेतृत्वाखाली बेलेश्वर पॅनलने उमेदवार उभे केले होते. गेल्या 15 दिवसांपासून आरोप-प्रत्यारोप एकमेकांनी करत प्रचारफेरी काढण्यात आल्या होते.

रविवारी झालेल्या मतदानाची मतमोजणी छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील इंद्रायणी लॉन येथे जिल्हा उपनिबंधक गणेश पुरी यांच्या मार्गदर्शनाखाली मतमोजणी पार पडली. यामध्ये भृंगऋषी पॅनेलचे 15 पैकी 15 उमेदवार मोठ्या मतांनी विजयी झाले.

विजय उमेदवार पुढीलप्रमाणे : सर्वसाधारण गट – कैलासराव खरपुडे (2825), माधव गोंधळे (2920), किसनराव चौधरी (3140), महेश झोडगे (3303), कैलास दळवी (2747), अमोल धाडगे (2947), राजेंद्र पतके (2793), विष्णू फुलसौंदर (2912), रुपेश भंडारी (2820), कैलास रासकर (2629). इतर मागावर्गीय – अनिलराव झोडगे (3301). वि.जा.भ.ज. – नामदेव लंगोटे (3375), अनुसूचित जाती-जमाती – एकनाथ जाधव (3174), महिला राखीव – तिलोत्तमा करांडे (2583), अनिता भुजबळ (2946) आदिं उमेदवार विजयी झाले.

जसजसे विजयी उमेदवारांची घोषणा होत होती, तस-तसे भृंगऋषी पॅनेलच्या समर्थकांनी मतदान केंद्राबाहेर मोठा जल्लोष करत घोषणा देत होते. मतदान व मतमोजणी प्रसंगी कॅम्प पोलिस स्टेशनने मोठा बंदोबस्त तैनात केला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *