महिलांना शासनाच्या योजनांचा लाभ मिळवून द्यावा – आ.राम शिंदे

भाजप केडगांव मंडल महिला अध्यक्षपदी सौ.सुरेखा खैरे

भारतीय जनता पाटीच्या केडगांव मंडल महिला अध्यक्षपदी सौ.सुरेखाताई विशाल खैरे यांची नियुक्ती करुन त्यांना आ.राम शिंदे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले. याप्रसंगी भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष अॅखड.अभय आगरकर, प्रा.भानुदास बेरड,  प्रशांत मुथा, निलेश सातपुते, डॉ श्रीधर दरेकर, कुंडलीक गदादे, संदेश रपारिया, विजय गायकवाड,  विजय घासे, सुरेश लालबागे, यशवंत खैरे, पंडित खुडे, गणेश जाधव, भागवत कुरधने, माजी नगरसेविका सौ.लता शेळके, कालिंदी केसकर, मालनताई ढोणे, प्रिया कुरधने आदी उपस्थित होते.
यावेळी आ.राम शिंदे म्हणाले, देशातील सर्वात मोठा पक्ष असलेल्या भारतीया जनता पार्टीचे पदाधिकारी म्हणून काम करण्याचा प्रत्येकाला अभिमान असला पाहिजे. भाजप प्रणित केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहचविण्याचे काम पदाधिकार्यांनी करावे. विशेषत: महिलांसाठी राबविण्यात येत असलेल्या योजनांचा लाभ त्यांना मिळवून द्यावा. नुतन पदाधिकारी सौ.सुरेखाताई खैरे यांचे पक्ष कार्यातील योगदान आणि महिलांचे संघटन चांगले असल्याने त्यांच्यावर पदाच्या जबाबदारी देण्यात आली आहे. ती त्या सक्षमपणे सांभाळून पक्षाचे ध्येय-धोरणे सर्वसामान्यांपर्यंत पोहचवतील असा विश्वास व्यक्त केला.
याप्रसंगी अभय आगरकर म्हणाले, नगर शहरात भाजपा पक्षाचे चांगल्या पद्धतीने काम सुरु असून, पदाधिकारी, कार्यकर्तेनागरिकांच्या संपर्कात राहून पक्ष कार्य वाढवित आहेत. केडगांव मंडलच्यावतीने पक्ष संघटन मजबूत होत आहे. सौ.सुरेखाताई खैरे यांचे महिला संघटन चांगल्या पद्धतीने सुरु असल्याने त्यांच्यावर पदाच्या माध्यमातून जबाबदारी देण्यात आली आहे. या पदाच्या माध्यमातून त्या महिलांपर्यंत भारतीय जनता पार्टीची ध्येय-धोरणे पोहचवत, जनमत निर्माण करतील, असे सांगितले.
निवडीनंतर सौ.सुरेखाताई खैरे म्हणाल्या, भाजपा पक्षात काम करत असतांना आता पक्षाने आपल्यावर जी जबाबदारी दिली. सर्वांना बरोबर घेऊन पार पाडू. वरिष्ठाच्या मार्गदर्शनाखाली पक्षाचे कार्य वाढवू. महिलांचे प्रश्न शासन दरबारी मांडून सोडवू असे सांगितले.
सौ.सुरेखाताई खैरे यांच्या निवडीबद्दल पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे, खा.सुजय विखे, भैय्या गंधे, केडगांव मंडल अध्यक्ष निलेश सातपुते, आदिंसह विविध क्षेत्रातून अभिनंदन होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *