उध्दव ठाकरे स्वतः मनोरुग्ण झाले आहेत व त्यांच्या  सत्तेच्या काळात ते घरकोंबडा होते अशी खोचक टीका आमदार राम शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केली

थोरात यांचे ‘भावी मुख्यमंत्री’ स्वप्न भंगणार
प्रा. शिंदे यांचा दावा, नगरमध्ये भाजपचे घर चलो अभियान


अहमदनगर-
भाजपचे सध्या घर चलो अभियान सुरू असून त्या अंतर्गत शनिवारी सायंकाळी सावेडी येथील प्रेमदान हडको परिसरात प्राध्यापक राम शिंदे यांनी मतदारांच्या भेटी घेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने केलेल्या कामांची माहिती दिली. यावेळी भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर, सरचिटणीस सचिन पारखी, माजी महापौर बाबासाहेब वाकळे, महिला जिल्ह्याध्यक्ष प्रिया जानवे आदीसह विविध पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी अबकी बार 400 पार, जय श्रीराम, भारत माता की जय घोषणा देण्यात आल्या.


  बाळासाहेब थोरात यांना विचारल्याशिवाय संगमनेर मध्ये कही  करण्याची हिम्मत कोणातच नसुन.संगमनेर  तेथे त्यांचे ‘भावी मुख्यमंत्री’ असे फलक लागले. त्यामुळे त्यांच्या मनातली स्वप्न लपून राहिलेलं नाही, परंतु त्यांचे ‘भावी मुख्यमंत्री’होण्याचे स्वप्न भंगणार आहे, असा दावा माजी पालकमंत्री, आमदार प्रा. राम शिंदे यांनी घर चलो अभियाना दरम्यान प्रेमदिन हाडको येथे केलं. तुम्ही ओरबाडून सत्ता मिळवली होती, परंतु आता माणसे सांभाळताना तुमची दमछाक उडाली आहे. देशात विरोधी पक्ष नेता देता येईल, एव्हडी ही संख्या तुमच्या पक्षाला मिळवता आलेली नाही, अशी टीकाही प्राध्यापक शिंदे यांनी थोरात यांच्यावर केली.


यावेळी माध्यमांशी बोलताना प्राध्यापक शिंदे यांनी विरोधकांवर टीका केली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून प्रभावी काम केले आहे व आताही उपमुख्यमंत्री व गृहमंत्री म्हणून ते कर्तव्यदक्ष काम करीत आहेत. मात्र, उद्धव ठाकरे फडणवीस यांच्यावर टीका करताना पातळी सोडत आहेत. ते स्वतः मनोरुग्ण झाले आहेत व त्यांच्या  सत्तेच्या काळात ते घरकोंबडा होते. करोना काळात कोणाच्या दुःखातही सहभागी होत नव्हते. त्यांची निष्क्रियता त्याच वेळी दिसली होती, पण आता निवडणूक असल्याने ते फडणवीस यांच्यावर टीका करीत आहेत, असा दावा करून शिंदे म्हणाले, विरोधकांनी केलेली राष्ट्रपतीची राजवट मागणी गांभीर्याने घेण्याची गरज नाही. राज्यातली कायदा व सुव्यवस्था स्थिती चांगली आहे. आपसातील वादातून काही घटना घडल्या असल्या तरी लोकांचे जीव जात असताना त्यावर राजकारण करणे व टोकाच्या टीका करणे, महाराष्ट्राची तुलना बिहारशी करणे हे विरोधकांना शोभत नाही, असा दावाही शिंदे यांनी केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *