उध्दव ठाकरे स्वतः मनोरुग्ण झाले आहेत व त्यांच्या  सत्तेच्या काळात ते घरकोंबडा होते अशी खोचक टीका आमदार राम शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केली

थोरात यांचे ‘भावी मुख्यमंत्री’ स्वप्न भंगणार प्रा. शिंदे यांचा दावा, नगरमध्ये भाजपचे घर चलो अभियान अहमदनगर-भाजपचे सध्या घर चलो अभियान सुरू असून त्या अंतर्गत शनिवारी सायंकाळी सावेडी येथील प्रेमदान हडको परिसरात प्राध्यापक राम शिंदे यांनी मतदारांच्या भेटी घेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने केलेल्या कामांची माहिती दिली. यावेळी भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर, सरचिटणीस सचिन पारखी,…

Read More

नगर शहर शिवसेना व शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष यांच्यावतीने निरिक्षणगृह व बालगृह येथील विद्यार्थ्यांना मिष्ठान्न भोजन

समाजातील दुर्लक्षित घटकांसाठी आपण काम केले पाहिजे

– दिलीप सातपुते

नगर – समाजातील प्रत्येक घटकांचा विकास झाला पाहिजे, त्यांना त्यांचे हक्क मिळाले पाहिजे, यासाठी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे हे कार्यक्षमपणे काम करत आहेत. जनतेचे मुख्यमंत्री म्हणून त्यांची ख्याती आहे. आपला वाढदिवस हा सामाजिक उपक्रमातून व्हावा, जनसेवेत साजरा व्हावा, अशी त्यांची इच्छा असते. त्यामुळेच नगर शहर शिवसेनेच्यावतीने अनाथ बालकांना मिष्ठान्न भोजन दिले. समाजातील दुर्लक्षित घटकांसाठी आपण काम…

Read More

मनसे सहकार सेनेच्या नगर शहराध्यक्षपदी गणेश शिंदे

पदाधिकार्‍यांनी लोकांचे प्रश्न प्रभावीपणे सोडवावेत – सचिन डफळ

नगर – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सहकार सेनेच्या नगर शहराधध्यक्षपदी गणेश शिंदे यांची नियुक्ती करुन पत्र देण्यात आले. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष सचिन डफळ, शहराध्यक्ष गजेंद्र राशिनकर, उपशहराध्यक्ष तुषार हिरवे, विद्यार्थी सेनेचे राज्य उपाध्यक्ष सुमित वर्मा, विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष प्रकाश गायकवाड, कामगार सेनेचे कार्यकारणी सदस्य संकेत जरे उपस्थित होते. याप्रसंगी सचिन डफळ म्हणाले, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या…

Read More

जिल्ह्यातील शाळांमध्ये 20 हजार वह्या वाटणार

-अभिषेक भोसले

मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त युवा सेनेचा उपक्रम नगर – मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र सरकारच्यावतीने सर्वसामान्यांना विविध योजनांचा माध्यमातून न्याय देण्यात येत आहे. समाजातील सर्व घटकांना बरोबर घेत त्यांच्या उन्नत्तीसाठी काम करत आहेत. त्यामुळे त्यांचा वाढदिवस हा सामाजिक उपक्रमातून साजरा केला जात आहे. शिक्षण घेतांना विद्यार्थ्यांना अडचणी येऊ नये यासाठी शासनाच्यावतीने विविध उपाय…

Read More

डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फौडेशन संचलित जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र विळद यांचामार्फत दिव्यांग सर्वेक्षण व तपासणी शिबिराचे आयोजन

देहरे, अहमदनगर डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फौडेशन संचलित जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र विळद घाट अहमदनगर, जिल्हा समाज कल्याण विभाग व ग्रामपंचायत देहरे यांच्या संयुक्त विद्यामाने दि. १० फेब्रुवारी रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र देहरे येथे दिव्यांगासाठी शिबिर आयोजित करण्यात आले ‍होते. या शिबिरात देहरे व परीसरातील पात्र दिव्यांगाची सहाय्यक साधनांसाठी पुनर्वसन केंद्रांच्या तज्ञाकडून तपासणी व नोंदणी…

Read More

आढाव दांपत्याची निर्घुण हत्या, मानवतेला काळीमा फासणारी – आ. बाळासाहेब थोरात

राहुरी येथील आढाव दांपत्याची निर्गुण हत्या करण्यात आली यावर बोलताना माझी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की,ज्याप्रकारे वकील आढाव दांम्पत्याची निर्घुण हत्या झाली ही घटना मानवतेला काळीमा फासणारी आहे अतिशय क्रूर पद्धतीने मारले गेले आहे त्या कारणांचा देखील शोध लागत नाही.का मारले गेले अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.वकील बांधवांमध्ये आता भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे…वकील…

Read More

वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्र्यांना मिळाले ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंचे आशीर्वाद

राळेगणसिद्धी अहमदनगर : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उद्या ९ फेब्रुवारी रोजी वाढदिवस आहे. या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मुख्यमंत्र्यांना फोन करत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. “हा तुमचा ६० वा वाढदिवस आहे, मात्र तुम्हाला शताब्दी साजरी करताना आम्हाला बघायचं आहे. सध्या लोकसंख्या वाढत चालली आहे आणि या वाढत्या लोकसंख्येत काम करण्यासाठी समाजाला तुमच्यासारख्या चांगल्या…

Read More

जिल्हाधिकारी कार्यालयाचे गेट न उघडल्याने अहमदनगर शहरातील वकील आक्रमक

अहमदनगर राहुरी तालुक्यातील आढाव दाम्पत्याच्या हत्येच्या निषेधार्थ गेल्या तीन तारखेपासून अहमदनगर शहरातील जिल्हा सत्र न्यायालयातील वकील बांधवांनी आपले काम बंद आंदोलन सुरू केले होते तसेच वकील प्रोटेक्शन कायदा कायदा लागू व्हावा यासाठी जिल्हा सत्र न्यायालयाच्या बाहेर धरणे आंदोलन देखील सुरू होते.आढाव दांपत्याच्या हत्येचा निषेध व ऍडव्होकेट प्रोटेक्शन कायदा लागू व्हावा यासाठी आज अहमदनगर जिल्ह्यातील सर्व…

Read More

कोतवाली पोलिस स्टेशन येथे केलेल्या मारहाणी बाबत

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विभाग अध्यक्ष असलेले किरण प्रशांत रोकडे आज दि ०८-०२-२०२४ रोजी रोकडे याचा मित्र सनी भुजबळ यास काही तरुणांनी मारहाण केल्यामुळे मी त्यांच्या सोबत कायदेशीर तक्रार देण्यासाठी कोतवाली पोलिस स्टेशन येथे गेलो होतो त्या वेळेस पोलिस निरीक्षक दराडे साहेब यांना जाऊन भेटलो असता आम्हाला कायदेशीर तक्रार द्यायची आहे असे सांगितले असता त्यांनी आम्हाला…

Read More

मनसेचे स्वच्छतागृहांच्या ठेकेदारांवर कारवाई

करण्याबाबतचे आंदोलन आश्वासनानंतर स्थगित

अहमदनगर मनपा हद्दीतील सार्वजनिक स्वच्छतागृहबाबत अनेक त्रुटी, उणिवाबाबत स्वच्छता गृहांच्या ठेकेदारांवर कारवाई करण्यात यावी याबाबत मनपा आयुक्तांना निवेदनाद्वारे आंदोलनाचा इशारा दिला होता. यानंतर अतिरिक्त आयुक्त यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर सदर आंदोलन स्थगित करण्यात आले असल्याची माहिती मनसेचे विभाग अध्यक्ष किरण रोकडे यांनी दिली. याबाबत ते म्हणाले, मनपाचे अतिरिक्त आयुक्त व आरोग्य विभागातील अधिकारी यांच्याशी झालेल्या चर्चेनुसार…

Read More