कोतवाली पोलिस स्टेशन येथे केलेल्या मारहाणी बाबत



महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विभाग अध्यक्ष असलेले किरण प्रशांत रोकडे आज दि ०८-०२-२०२४ रोजी
रोकडे याचा मित्र सनी भुजबळ यास काही तरुणांनी मारहाण केल्यामुळे मी त्यांच्या सोबत कायदेशीर तक्रार देण्यासाठी कोतवाली पोलिस स्टेशन येथे गेलो होतो त्या वेळेस पोलिस निरीक्षक दराडे साहेब यांना जाऊन भेटलो असता आम्हाला कायदेशीर तक्रार द्यायची आहे असे सांगितले असता त्यांनी आम्हाला सांगितले कि तुम्ही १० मिनिटे बाहेर जाऊन बसा नंतर तुम्हास बोलवतो व तुमची तक्रार नोंदून घेतो .असे सांगितले त्यामुळे मी व माझा मित्र पोलिस स्टेशनच्या आवारात असलेले झाडाखाली उभे राहिलो होतो. त्या नंतर पाच मिनिटांनी सिव्हिल ड्रेस परिधान केलेला तानाजी पवार हा पोलिस कर्मचारी तेथे आला व त्याने मला किरण रोकडे तूच का असे विचारले असता मला सर्वाच्या समोर शिवीगाळ करत काही कारण नसताना मला लाथा बुक्यांनी मारहाण केली व तू इथून लगेच निघून जा परत जर इथे दिसलास तर तुला खोट्या गुन्ह्यात अडकून तानाजी काय आहे हे तुला दाखवील वरील कर्मचारी तानाजी पवार याने कायदा हातात घेऊन मला वरील प्रमाणे मारहाण केली असून कोतवाली पोलिस स्टेशन आवारातील सी सी टीव्ही फुटेज तपासून सदरील कर्मचारी वर कठोर कारवाई करून त्यास सेवेतून निलंबित करण्यात यावे अशा प्रकारचे निवेदन मनसेच्या वतीने अप्पर पोलिस अधीक्षक प्रशांत खेरे यांना देण्यात आले यावेळी मनसेचे विभाग प्रमुख किरण रोकडे ,शहरजिल्हाध्यक्ष गजेंद्र राशीनकर ,शहर सचिव संतोष साळवे ,संकेत व्यवहारे ,महेश चव्हाण आदी उपस्थित होते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *