महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचा वाढदिवस पाथर्डी तालुक्यात धुमधडाक्यात साजरा




पाथर्डी येथे महाराष्ट्र राज्याचे “अनाथांचे नाथ असलेले” लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मोहटादेवी गावच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये तसेच परिसरातल्या वाड्यावस्त्यांवर असलेल्या जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये व मूकबधिर विद्यालय कारेगाव येथे शालेय साहित्य व खाऊचे वाटप करण्यात आले.

यावेळी मोहटादेवी येथे मोहटादेवीचे दर्शन घेऊन मुख्यमंत्र्याला दीर्घायुष्य लाभो त्यांच्या हातून महाराष्ट्राचा विकास होवो ते पुन्हा मुख्यमंत्री होवो, आई मोहटादेवीच्या चरणी प्रार्थना केली. त्याप्रसंगी अहमदनगरच्या प्रथम महिला महापौर शीलाताई शिंदे, नगरसेविका सौ.अश्विनीताई जाधव, वैद्यकीय मदत कक्ष उपजिल्हाप्रमख शिंदे ,तालुकाप्रमुख विष्णुपंत ढाकणे तालुक्यातील मोठ्या प्रमाणात शिवसैनिक उपस्थित होते .

त्यामध्ये म्हातारदेव ,डांगे नारायण शेकडे, सुरेश फुले ,जूते संदीप ,पालवे महादेव ,भैय्या दहिफळे ,माजी सरपंच महादेव दहिफळे, अर्जुन धायतडक, सतीश पालवे ,शेकटा गावचे सरपंच माऊली घुले ,दत्तात्री खेडकर हे सर्व मान्यवर उपस्थित होते.या कार्यक्रमाचे आयोजन पाथर्डी तालुकाप्रमुख विष्णुपंत ढाकणे यांनी केले होते.

तसेच महाराष्ट्र राज्याचे कार्यसम्राट मुख्यमंत्री यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना तालुकाप्रमुख विष्णुपंत ढाकणे यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यात ठिक ठिकाणी मोहटादेवी गावातील जिल्हा परिषद शाळेतील मूकबधिर विद्यालय मोहटादेवी रोड येथील शाळेतील विद्यार्थ्यांना मिठाईचे वाटप करून व महाराष्ट्रातील प्रसिद्ध देवस्थान मोहटादेवी येथे मुख्यमंत्री साहेबांना उदंड आयुष्य लाभो यासाठी प्रार्थना करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *