उद्योजक दिलीप धोका परिवाराच्यावतीने श्री विशाल गणेश मंदिरास देणगी
नगर – शहराचे ग्रामदैवत असलेले श्री विशाल गणेशाचे सर्वांवर मोठी कृपादृष्टी आहे. नवसाला पावणारा श्री विशाल म्हणून सर्वदूर प्रचिती आहे. त्यामुळे अनेक भाविक हे नियमित या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात. त्यांच्या मनोकामना पूर्ण होत असल्याने दिवसेदिवस देवस्थानच्या लौकिकात भर पडत आहे. धोका परिवाराचे देवस्थानास नेहमीच सहकार्य राहिले आहे. आज चि.पुष्पकार हे सी.ए. झाल्याबद्दल श्री गणेशाचे दर्शन घेऊन त्यांच्या पुढील कार्यास सुरु केली आहे. त्यांच्या कार्यास श्री विशाल गणेश नक्कीच यश देईल. धोका परिवाराने मंदिर निर्माण कार्यास केलेली मदत मोलाची आहे, असे प्रतिपादन श्री विशाल गणेश देवस्थानचे उपाध्यक्ष पंडितराव खरपुडे यांनी केले.

उद्योजक दिलीप बाबुलाल धोका यांचे चिरंजीव पुष्कराज हे चार्टड अकौंटंट झाल्याबद्दल शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणेश मंदिरात धोका परिवाराच्यावतीने आरती करुन मंदिराच्या सुशोभिकरणासाठी आर्थिक मदतीचा धनादेश दिला. याप्रसंगी दिलीप धोका, पुष्कराज धोका, देवस्थान उपाध्यक्ष पंडितराव खरपुडे, विश्वस्त पांडूरंग नन्नवरे, चंद्रक़ांत फुलारी, गजानन ससाणे, विजय कोथिंबीरे, माणिकराव विधाते, नितीन पुंड आदि उपस्थित होते.

याप्रसंगी दिलीप धोका म्हणाले, श्री विशाल गणेशावर आमच्या परिवाराची मोठी श्रद्धा आहे. वडिल स्व.बाबुलालजी धोका यांचे मंदिरास नेहमीच योगदान राहिले आहे. आम्ही प्रत्येक चांगल्या कार्याची सुरुवात श्री विशाल गणेशाच्या दर्शनाने करत असतो. आज मुलगा पुष्कराज सी.ए. झाला, ही मनोकामना पूर्ण झाली आहे. त्यानिमित्त छोटीशी मदतीच्या माध्यमातून कृतज्ञता व्यक्त केली असल्याचे सांगितले.

यावेळी देवस्थानच्यावतीने धोका परिवाराचा श्री विशाल गणेशाची प्रतिमा, शाल, श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. शेवटी पांडूरंग नन्नवरे यांनी सर्वांचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *