फलकेवाडी येथे सर्वरोग निदान शिबीर संपन्न

ग्रामीण भागात आरोग्य सेवेची गरज -डॉ.मनिषा कुलकर्णी नगर – आरोग्याबाबत जागृती व्हावी, एखाद्या व्याधीवर वेळेत उपचार मिळाव्यात हा उद्देशाने ग्रामीण भागात सर्वरोग निदान शिबीराचे आयोजन केल्याने आरोग्य सेवा सर्वांपर्यंत पोहचण्यास मदत होणार आहे. शिबीरात तज्ञ डॉक्टरांनी ग्रामस्थांची तपासणी करुन उपचार केले तसेच औषधेही देण्यात आली. तसेच आरोग्याबाबत मार्गदर्शन केल्याने त्यांच्यात जागृती होऊन उत्तम आरोग्य राहील,…

Read More

खा. सुजय विखे पाटील यांनी अयोध्येत जाऊन प्रभू श्रीरामांना अर्पण केले लाडू

*जिल्ह्यातील माता भगिनींनी नैवेद्यासाठी बनवलेले लाडू खा. सुजय विखेंनी अयोध्येत जाऊन प्रभू श्रीरामांना केले अर्पण..* अयोध्या(प्रतिनिधी)आज खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी अयोध्येत प्रभू श्रीरामांच्या जन्मभूमीत जाऊन अहमदनगर जिल्ह्यातील माता भगिनींनी बनवलेले नैवेद्यासाठीचे लाडू प्रभू श्रीरामांना चरणी अर्पण केले. श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने डॉ. सुजय विखे पाटील यांच्या माध्यमातून जिल्ह्यात मोफत साखर वाटप करण्यात आली…

Read More

विक्रीस आणलेल्या दोन गावठी कट्टयासह तोफखाना पोलीसांनी केले एका आरोपीस जेरबंद

तोफखाना पोलीस स्टेशन हद्दीत गंगा उदयान जवळ मंगळवारी सायंकाळी 18.15 वाजे सुमा एक इसम गावठी कट्टे घेवुन विक्री करण्या करीता येत असल्याची माहिती पो.नि. श्री आनंद कोकरे यांना गुप्त मिळालेल्या माहीतीवरुन त्यांनी तपास पथकाचे पो स ई श्री सचिन रणशेवरे व व स्टाप यांना बोलावुन आरोपीवर कायदेशीर कारवाई करणे बाबत आदेश दिल्याने पोलीसांनी गंगा उदयान भागात सापळा रचुन इसम नामे करण कृष्णा फसले वय 30 वर्षे रा. ख्रिस्त गल्ली, अहमदनगर हा मिळून आल्याने त्यास ताब्यात घेवुन त्याचे कब्जातुन 40, 000/- रु किंमतीचे दोन गावठी कट्टे (पिस्तोल) हस्तगत केले असुन सदर बाबत पोहेकॉ भानुदास खेडकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन तोफखाना पोलीस स्टेशन गु र नं – 129/2024 आर्म ऍ़क्ट कायदा कलम 3/25 प्रमाणे गुन्हा दाखल केला असुन सदर गुन्हयाचा पुढील तपास पोसई श्री सचिन रणशेवरे हे करत आहेत.
सदरची कारवाई ही मा.श्री राकेश ओला, पोलीस अधीक्षक अहमदनगर, मा.श्री प्रशांत खैरे अपर पोलीस अधीक्षक अहमदनगर, मा.श्री अनिल भारती उप विभागीय पोलीस अधिकारी अहमदनगर शहर विभाग यांचे मार्गदर्शनाखाली मा.पो.नि श्री आंनद कोकरे, पो.उपनिरी श्री सचिन रणशेवरे, पोहेकॉ दिनेश मोरे, पोहेकॉ भानुदास खेडकर पोहेकॉ दत्तात्रय जपे, पोहेकॉ सुनिल शिरसाट, पोहेकॉ अहमद इनामदार, पोहेकॉ सुधीर खाडे, पो ना वसीम पठाण, पो ना संदिप धामणे, पोकॉ सुमीत गवळी, पो.कॉ. शिरीष तरटे, पोकॉ दत्तात्रय कोतकर, पोकॉ सतीष भवर, पोकॉ सतीष त्रिभुवन, पोकॉ बाळासाहेब भापसे यांनी केली आहे.

Read More

अहमदनगर जिल्ह्यातील बेलवंडी गावात ६१८ एकर मध्ये उभारली जाणार उद्योग नगरी

मुंबई आज मुंबई येथे राज्याचे महसूल मंत्री श्री. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षेखाली व उद्योगमंत्री उदय सांमत यांच्या प्रमुख उपस्थितीत अहमदनगर जिल्ह्याच्या दृष्टीने महत्त्वाची बैठक संपन्न झाली.
यावेळी जिल्ह्यातील बेलवंडी ता. श्रीगोंदा येथील शेती महामंडळाच्या ६१८ एकर जमिनीवर एमआयडीसी उभारण्याला तत्वतः मान्यता देण्यात आली आहे.

सदर एमआयडीसीच्या आराखड्यासंदर्भात पाहणी व सर्वेक्षण लवकरात लवकर पूर्ण करून त्या संबंधित सर्व कामे काल मर्यादेत करण्यात यावीत असे निर्देश महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी यावेळी अधिकारांना दिले.

एमआयडीसी सुरू करण्यासंदर्भात मोजणीचा अहवाल मागविण्यात आला आहे. पुढील प्रकियेस गती देण्यात येणार असून, तात्काळ हे काम पुर्ण करण्यात येणार असल्याची माहिती उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिली. तसेच, जिल्हाधिकारी यांनी आजच उद्योग विभागाकडे विनंती प्रस्ताव सादर करावा असेही त्यांनी यावेळी सांगितले.

श्रीगोंदा तालूक्यातील बेलवंडी फार्म येथे शेती महामंडळाची मौजे पर्वतवाडी आणि महादेववाडी येथील ६१८ एकर जमीन उद्योग विभागला देण्याची तत्वत: मान्यता यावेळी देण्यात आली. या एमआयडीसी करिता खासदार डॉ. सुजय विखे पाटील आणि माजी मंत्री आमदार बबनराव पाचपुते यांनी पाठपुरावा केला होता. उद्योगनगरीसाठी जमीन दिल्याने खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी राज्याचे महसूल मंत्री श्री. राधाकृष्ण विखे पाटील आणि उद्योगमंत्री श्री. उदय सांमत यांचे आभार व्यक्त केले.

खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांनी सांगितले की बेलवंडी मध्ये रस्ते वाहतूक, पाणी तसेच रेल्वे वाहतुक सुविधा उपलब्ध तर आहेच शिवाय शिर्डी, पुणे आणि नाशिक एमआयडीसी केंद्र नजीक असल्याने येणाऱ्या काळात बेलवंडी उद्योजकांना मोठी पर्वणीच ठरणार आहे.
या एमआयडीसी मुळे जिल्ह्यात उद्योगाला चालना मिळून मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

दरम्यान, श्रीरामपूर तालुका व राहता तालुक्यातील शेती महामंडळाकडे असलेल्या जमिनीच्या समस्यांबाबत चर्चा करण्यात आली. खंडकरी शेतकऱ्यांना वाटप केलेल्या जमिनींचा भोगवटादार वर्ग / मधुन भोगवटादार वर्ग १ करणे तसेच सार्वजनिक प्रयोजनार्थ शेती महामंडळाची जमीन वाटप करणे संदर्भातील कामांचा आढावा मंत्री विखे पाटील यांनी घेतला.

सदर बैठकीत खासदार डॉ. सुजय विखे पाटील, माजी मंत्री आमदार श्री.बबनराव पाचपुते, महसूल विभागाचे अप्पर सचिव श्री. राजगोपाल देवरा, अहमदनगरचे जिल्हाधिकारी श्री.सिद्धराम सालीमठ, शेती महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक श्री. विश्वजित माने यांच्यासह महसूल आणि शेती महामंडळ पुणे यांचे अधिकारी उपस्थित होते.

Read More

शरद पवारांच घड्याळ अजित पवारांच्या हातात,
शरद पवारांना मोठा धक्का, निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय!

अहमदनगरकाँग्रेस मधून बाहेर पडून ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी स्थापन केलेल्या राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळ चिन्हाचा निवडणूक आयोगाने धक्कादायक निर्णय दिला असून.राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळ चिन्ह उपमुख्यमंत्री अजित पवार यांचेच आहे असा महत्त्वाचा निर्णय आज निवडणूक आयोगाने दिला. जुलै महिन्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडली. तत्कालीन विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सत्ताधारी महायुतीबरोबर जात उपमुख्यमंत्री…

Read More

जन आधार सामाजिक संघटनेच्या वतीने उपविभागीय अभियंतांच्या कार्यालयास ठोकले टाळे.

स्टेट बँक चौक ते भिंगार, शहापूर रस्त्याचे काम लेखी आश्वासन देऊनही पूर्ण होत नसल्याचा आरोप – अहमदनगर शहरातून जाणाऱ्या स्टेट बँक चौक भिंगार शहापूर रस्त्याचे काम मागील चार वर्षापासून रखडलेले आहे या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहे त्यामुळे जन आधार सामाजिक संघटनेच्या वतीने उपविभागीय अभियंता दि.ना. तारडे यांच्या कार्यालयावर चपलाचा हार घेऊन आंदोलन करण्यात…

Read More

तीन वर्षापासून रखडलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या कामानिमित्त जिल्हाधिकारी यांना निवेदन.

रस्त्याच्या कामात दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी- अभिषेक कळमकर. अहमदनगर भिंगार शहरातून जाणाऱ्या कल्याण विशाखापट्टणम या राष्ट्रीय महामार्गाचे काम गेल्या तीन वर्षापासून रखडलेले आहे त्यामुळे भिंगार ते मेहेकरी दरम्यान रस्त्याची दुरावस्था मोठ्या प्रमाणात झालेली आहे रस्त्यावरील खड्डेही बुजवण्यात आलेले नाही त्यामुळे या मार्गावर प्रवास करताना वाहनचालकांना कसरत करावी लागते याच खड्ड्यांमुळे…

Read More

सारसनगर येथील संत भगवानबाबा व संत वामनभाऊ पुण्यतिथी सोहळ्याची काल्याची दहिहंडीने सांगता

भगवान बाबांच्या विचारांचा वारसा तरुण पिढीने पुढे चालविण्याची गरज – आ.संग्राम जगताप       नगर ही संतांची भुमी आहे, त्यामुळे आपण या भुमीत जन्माला आलो ही आपले भाग्य आहे. या संतांनी समाजाला धार्मिकतेतून दिशा देण्याचे काम केले आहे. संत भगवान बाबा व संत वामनभाऊ यांनी आपल्या किर्तन – प्रवचनातून समाजात जागृती केली. विचार कधी थांबत नाहीत, भगवान बाबांच्या विचारांचा, अध्यात्मिक धर्माचा वारसा तरुण पिढीने पुढे चालविण्याची गरज आहे. गेल्या अनेक वर्षांपासून  दरवर्षी सप्ताहाचे आयोजन करुन भगवान बाबा व संत वामनभाऊ यांचे विचार जनमानसात रुजवत आहे. जिल्ह्यात सप्ताहाने चांगली ख्याती निर्माण केली असून, अशा धार्मिक कार्यातून समाजाला दिशा देण्याचे काम होत आहे. धार्मिक कार्यात जगताप परिवाराने नेहमीच पुढाकार घेतला आहे. अध्यात्मिक क्षेत्रात काम करणार्‍यांच्या मागे आम्ही नेहमीच उभे राहतो. ज्या भागाचे नाव संत भगवान बाबा आहे, त्या भागास कुठलीच कमतरता भासू शकत नाही. हा अध्यात्माचा वारसा असाच पुढे सुरु राहिल, असा विश्वास आ.संग्राम जगताप यांनी व्यक्त केला.      संत भगवानबाबा व संत वामनभाऊ पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त सारसनगर येथे संत भगवानबाबा मंदिरात अखंड हरिनाम सप्ताहाच्या समारोपप्रसंगी काल्याची दहिहंडी  हभप जगन्नाथ महाराज गर्जे यांच्या हस्ते फोडण्यात आली. याप्रसंगी आ. संग्राम जगताप, माजी उपमहापौर गणेश भोसले, माजी नगरसेवक प्रकाश भागानगरे, विपुल शेटीया, दादासाहेब उंडे, झुंबर आव्हाड, म्हातारदेव घुले, देवराम घुले, रामदास बडे, बबनराव घुले, अनिल पालवे, भगवान आव्हाड, उद्धव ढाकणे, मच्छिंद्र दहिफळे, अजय कर्‍हाड, अंकुश वायभासे आदिंसह भाविक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.      याप्रसंगी हभप जगन्नाथ महाराज गर्जे यांनी किर्तनातून आध्यात्म हे आपल्या जीवनाचा एक भाग आहे. मन:शांतीसाठी भगवंतांचे नामस्मरण आवश्यक आहे. आपल्या दु:खाचे निराकरण करण्याची ताकद नामस्मरणात आहेत. सप्ताहानिमित्त अखंड हरिनामाचा जाप केल्याने आपल्यात एक प्रकारे ऊर्जा निर्माण होत असते. त्यासाठी प्रत्येकाने भगवंताचे नामस्मरण केले पाहिजे.      याप्रसंगी उपमहापौर गणेश भोसले, प्रकाश भागानगरे आदिंनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन बबन घुले यांनी केले तर आभार अनिल पालवे यांनी मानले.      या सप्ताहा काळात महाराष्ट्रातील नामवंत किर्तनकार, प्रवचनकार यांनी आपली सेवा दिला. सप्ताहांतर्गत दररोज पहाटे काकडा, ज्ञानेश्वरी पारायण, प्रवचन, सायंकाळी हरिपाठ व रात्री किर्तन असे दैनंदिर कार्यक्रम संपन्न झाले. महाप्रसादाने सप्ताहाची सांगता झाली. सप्ताहा यशस्वीतेसाठी श्री संत भगवान बाबा प्रतिष्ठान ट्रस्ट व भक्त मंडळ पंचक्रोशी यांनी परिश्रम घेतले. सप्ताहाचे हे 16 वे वर्ष होते.

Read More

उद्योजक दिलीप धोका परिवाराच्यावतीने श्री विशाल गणेश मंदिरास देणगी
नगर – शहराचे ग्रामदैवत असलेले श्री विशाल गणेशाचे सर्वांवर मोठी कृपादृष्टी आहे. नवसाला पावणारा श्री विशाल म्हणून सर्वदूर प्रचिती आहे. त्यामुळे अनेक भाविक हे नियमित या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात. त्यांच्या मनोकामना पूर्ण होत असल्याने दिवसेदिवस देवस्थानच्या लौकिकात भर पडत आहे. धोका परिवाराचे देवस्थानास नेहमीच सहकार्य राहिले आहे. आज चि.पुष्पकार हे सी.ए. झाल्याबद्दल श्री गणेशाचे दर्शन घेऊन त्यांच्या पुढील कार्यास सुरु केली आहे. त्यांच्या कार्यास श्री विशाल गणेश नक्कीच यश देईल. धोका परिवाराने मंदिर निर्माण कार्यास केलेली मदत मोलाची आहे, असे प्रतिपादन श्री विशाल गणेश देवस्थानचे उपाध्यक्ष पंडितराव खरपुडे यांनी केले.

उद्योजक दिलीप बाबुलाल धोका यांचे चिरंजीव पुष्कराज हे चार्टड अकौंटंट झाल्याबद्दल शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणेश मंदिरात धोका परिवाराच्यावतीने आरती करुन मंदिराच्या सुशोभिकरणासाठी आर्थिक मदतीचा धनादेश दिला. याप्रसंगी दिलीप धोका, पुष्कराज धोका, देवस्थान उपाध्यक्ष पंडितराव खरपुडे, विश्वस्त पांडूरंग नन्नवरे, चंद्रक़ांत फुलारी, गजानन ससाणे, विजय कोथिंबीरे, माणिकराव विधाते, नितीन पुंड आदि उपस्थित होते.

याप्रसंगी दिलीप धोका म्हणाले, श्री विशाल गणेशावर आमच्या परिवाराची मोठी श्रद्धा आहे. वडिल स्व.बाबुलालजी धोका यांचे मंदिरास नेहमीच योगदान राहिले आहे. आम्ही प्रत्येक चांगल्या कार्याची सुरुवात श्री विशाल गणेशाच्या दर्शनाने करत असतो. आज मुलगा पुष्कराज सी.ए. झाला, ही मनोकामना पूर्ण झाली आहे. त्यानिमित्त छोटीशी मदतीच्या माध्यमातून कृतज्ञता व्यक्त केली असल्याचे सांगितले.

यावेळी देवस्थानच्यावतीने धोका परिवाराचा श्री विशाल गणेशाची प्रतिमा, शाल, श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. शेवटी पांडूरंग नन्नवरे यांनी सर्वांचे आभार मानले.

Read More

महेंद्र मधुकर वारे कनिष्ठ महाविद्यालयाच्या इ. 12 वी च्या विद्यार्थ्यांना निरोप

शालेय जीवन प्रत्येक टप्प्यावर मार्गदर्शक – वृषाली करोसिया नगर – शैक्षणिक जीवनातील 10 वी आणि 12 वी हे सर्वात महत्वाचे टप्पे आहेत. या परिक्षेतील विद्यार्थ्यांनी मिळविलेले यश त्याच्या करिअरची पुढील दिशा ठरत असते. त्यामुळे विद्यार्थ्यांना चांगला अभ्यास करुन परिक्षेला सामोरे गेले पाहिजे. शिक्षकांची तुमचे भविष्य घडविण्यासाठीच धडपड असते. आपला विद्यार्थी स्पर्धेच्या युगात टिकला पाहिजे, त्यादृष्टीने…

Read More