नंदनवन मित्र मंडळ व नगरसेविका सुवर्णा जाधव यांच्यावतीने हिंदृहृदयसम्राट स्व.बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन

मराठी जनतेच्या मनात हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे कायम आदाराचे स्थान – सुरेखा कदम

मराठी माणसाच्या हितरक्षणासाठी आणि हिंदुत्वाच्या प्रसारासाठी अनेक वर्षे आपल्या कर्तृत्व आणि वक्तृत्वाची तलवार तळपती ठेवणारे तेजस्वी नेतृत्व आणि तमाम मराठी जनतेच्या मनात हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी कायम आदाराचे स्थान मिळविले. महाराष्ट्रात सत्ता असताना आणि सत्तेबाहेर असतानाही राज्याच्या राजकारणावर आपला रिमोट कंट्रोल कायम ठेवला. त्यांचा हा मराठी बाणा त्यांनी महाराष्ट्रातील जनतेत निर्माण केला. त्यांचे विचार शिवसैनिकांना कायम प्रेरणादायी राहतील. महिलांचा सन्मान करण्याची त्यांची शिकवण शिवसैनिक प्रत्यक्षात अंमलात आणून त्यांचे प्रश्न सोडवत आहे. त्याचप्रमाणे विविध पदाच्या माध्यमातून महिलाही चांगल्या पद्धतीने काम करुन सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवित आहेत, माजी माजी महापौर सुरेखा कदम यांनी केले.

नंदनवन मित्र मंडळ व नगरसेविका सुवर्णा जाधव यांच्यावतीने हिंदृहृदयसम्राट स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी माजी महापौर सुरेखा कदम, नगरसेविका सुवर्णा जाधव, स्मिता अष्टेकर, आशा निंबाळकर, अरुणा गोयल, आशा जाधव, डॉ.अमोल जाधव, संजय जाधव, मिनाताई सत्रे, दत्ता जाधव आदि उपस्थित होते.

याप्रसंगी सुवर्णाताई जाधव म्हणाल्या, हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे हे शिवसैनिकांचे दैवत आहेत. युवकांना दिशा देण्याचे काम करुन त्यांच्यात स्वाभिमान जागविला. महिलांचा सन्मान हा त्यांचा आदेश होता. त्यामुळे महिलांना शिवसेनेत मानाचे स्थान आहे. त्यांनी घालून दिलेल्या विचारांवरच शिवसैनिक काम करत आहे. त्यामुळे आज सर्वस्तरातील नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी शिवसैनिक महिला आघाडी चांगल्या पद्धतीने काम करत आहे. त्यांचे विचार कायम प्रेरणादायी राहील, असे सांगितले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मिनाताई सत्रे यांनी केले तर आभार दत्ता जाधव यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *