विजय औटी शिवसेनेतून निलंबित

जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे यांची माहिती


नगर : प्रतिनिधी

     विधानसभेचे माजी उपाध्यक्ष तथा शिवसेनेचे उपनेते विजय औटी यांचे पक्षविरोधी कारवाई केल्यामुळे शिवसेनेतून निलंबन करण्यात आले आहे. पक्षाच्या वरिष्ठांच्या आदेशानंतर पक्षाचे जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे यांनी गुरुवारी उशिरा आवटी यांच्या निलंबनाचे आदेश जारी केले.

     लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील महाविकास आघाडीमध्ये शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचाही समावेश आहे. असे असतानाही औटी यांनी महाविकास आघाडीच्या विरोधतील भाजपचे उमेदवार डॉ. सुजय विखे यांना पाठिंबा देण्याचा एकतर्फी निर्णय बुधवारी रात्री  घोषित केला. निवडणुकीसंदर्भात औटी यांनी दोन दिवसापूर्वी बोलाविलेल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत बहुतांश पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार महाविकास आघाडीच्या उमेदवारास पाठबळ द्यावे अशी भूमिका मांडली होती. मात्र पदाधिकाऱ्यांच्या भावना धुडकावत औटी यांनी विखे यांना पाठिंबा देण्याचा एकतर्फी निर्णय जाहीर केला.

     औटी  यांच्या  निर्णयानंतर जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे यांनी तालुकाप्रमुख डॉ. श्रीकांत पठारे व इतर पदाधिकारी यांच्याशी संपर्क साधून गुरुवारी सकाळी नजर येथे बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीत पदाधिकाऱ्यांनी आपल्या भावना महाविकास आघाडी सोबत असल्याचे तसेच औटी यांनी परस्पर निर्णय घेतल्याचे सांगितले. बैठकीनंतर आ. निलेश लंके यांच्याशीही गाडे यांनी पदाधिकारी, शिवसैनिक यांची चर्चा घडउन आणत  राष्ट्रवादी व शिवसेनेमध्ये समय घडून आणला.

     राज्यामध्ये महाविकास आघाडी व महाआघाडी यांच्यामध्ये चुरशीने निवडणूक लढवली जात असताना औटी यांनी घेतलेल्या पक्षविरोधी भूमिकेबाबत माध्यमांमध्ये चर्चा झाल्यानंतर वरिष्ठांच्या आदेशानुसार विजय औटी यांचे पक्षातून तातडीने निलंबन करण्यात येत असल्याचे गाडे यांनी निवेदनाद्वारे जाहीर केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *