प्रतिंबिब फोटो फेस्टीव्हल अहमदनगरच्या वतीने आयोजित दुसऱ्या नॅशनल फोटोग्राफी स्पर्धेत नगरचे वृत्तछायाचित्रकार उदय जोशी यांच्या छायाचित्रास प्रथम क्रंमाक मिळाला.



अहमदनगर जिल्हा मराठा विदया प्रसारक समाजाच्या न्यू आर्टस् कॉमस अँड सायन्स कॉलेजच्या डिपार्टमेंट ऑफ कम्युनिकेशन स्टीडिज यांच्या तर्फे आयोजित १७ वा प्रतिंबिब फिल्म फेस्टीव्हल नुकताच संपन्न झाला.
  या निमित्ताने राष्ट्रीय प्रतिबिंब फोटोग्राफी स्पर्धा आयोजित केली होती. स्पर्धेचे हे दुसरे वर्ष आहे.   स्ट्रीट फोटोग्राफी ही यावषीची थीम होती.  या स्पर्धेकरीता ५०० छायाचित्रकारांनी प्रवेशिका पाठविल्या होत्या.  या ५०० स्पर्धकातून उदय जोशी यांची प्रथम क्रंमाकाकरीता निवड आली आहे. प्रा.
एस. बी. गिऱ्हे, व्हा  चेअरमन प्राध्यापक डॉ. डी आर ठुबे यांच्या प्रमुख उपस्थितीत न्यू आटर्स च्या राजर्षी शाहू महाराज सभागृहात हा समारंभ संपन्न झाला.

दिल्लीगेट येथील शनि-हनुमान मंदिरासमोर २२ जानेवारी रोजी श्रीराम मुर्ती प्राणप्रतिष्ठापनेनिमित्त अयोध्या येथील राम मंदिराची प्रतिकृती तयार केली होती. त्या प्रतिकृतीचे दर्शन घेणारी महीला असे ते छायाचित्र आहे. वरवर पाहता ती श्रीराम मंदिर प्रतिकृती व रामभक्त महिला असे या छायाचित्रात दिसते.

मात्र श्रीराम मंदिर प्रतिकृतीचे दार व मंदिराचे दार अतिशय कल्पकतेने प्रतिकृतीच्या निर्मात्यांनी जुळवले होते. त्यामुळे पाहणा-या व अनुभवणा-यारांना दोन भिन्न आभास यातून निर्माण होत होते. साडेपाचशे वर्षाच्या दीर्घ कालावधीनंतर प्रभू रामचंद्रांचे मंदिर उभे राहिले यामुळे प्रत्येक भाविकाच्या मनात भावना उचंबळून येत होत्या मात्र प्रत्येकालाच अयोध्येला जाणे शक्य नव्हते अशा स्थितीत याची देही याची डोळा राम मंदिराचे आंदोलन व प्रत्यक्ष राम मंदिर पाहायला मिळाले याची धन्यता अनेकांच्या मनात दाटून आली होती. मात्र वयाच्या उतरणीला हीच आपली अयोध्या असे मानून ती वृद्ध महिला अतिशय पवित्र अंत:करणाने हे दृश्य मनात साठवून अंतःकरणापासून गर्भगृहातील रामरायाला नमस्कार करत असावी असा विचार मनाला स्पर्शून गेला. वृत्त छायाचित्रकार या दृष्टिकोनातून तो क्षण टिपला व तो प्रथम पारितोषिक प्राप्त ठरला.

या यशाबददल अहमदनगर जिल्हा मराठा विदया प्रसारक समाजाचे अध्यक्ष रामचंद्र दरे , सचिव जी. डी. खानदेशे व सर्व विश्वस्त, मुख्याध्यापक तसेच विविध मान्यवरांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *