अ‍ॅड.राहुल रासकर यांची भाजप सुपर वॉरियर्सपदी नियुक्ती

पदाच्या माध्यमातून केंद्र सरकारचे काम जनतेपर्यंत पोहचवावे

-अ‍ॅड.अभय आगरकर



     नगर –

भाजपप्रणित केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने 10 वर्षात केलेल्या विविध लाभदायी विकास कामांचा लेखा-जोखा जनतेसमोर मांडून येणार्‍या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी भाजपाच्या पदाधिकार्‍यांनी काम करावे. आज नियुक्त झालेले सुपर वॉरियर्स यांच्यावर पदाच्या माध्यमातून मोठी जबाबदारी दिलेली आहे. आपण आपल्या भागात घर टू घर जावून पक्षाचे कार्य जनसामान्यांपर्यंत पोहचवावे. राज्यातील जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वाखाली हे सुपर वॉरियर्सची नियुक्ती करण्यात येत आहे. पक्षातील चांगल्या कार्याची दखल घेत अ‍ॅड.राहुल रासकर यांच्यावर ही जबाबदारी दिली आहे. मिळालेल्या पदाच्या माध्यमातून पक्षासाठी ते चांगले योगदान देतील, असा विश्वास अ‍ॅड.अभय आगरकर यांनी व्यक्त केला.

     भाजप शहर जिल्हा सरचिटणीस अ‍ॅड.राहुल रासकर यांची सुपर वॉरियर्स म्हणून नियुक्ती करण्यात आली. याप्रसंगी शहर जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.अभय आगरकर, माजी महापौर बाबासाहेब वाकळे, लोकसभा समन्वयक प्रा.भानुदास बेरड, जिल्हा सरचिटणीस सचिन पारखी, प्रशांत मुथा आदि उपस्थित होते.

     नियुक्तीनंतर अ‍ॅड. राहुल रासकर म्हणाले, केंद्रातील भाजपा सरकारने सर्व घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. विविध विकास कामांच्या माध्यमातून सर्वांगिण विकास साधला जात आहे. येणार्‍या सर्वच निवडणुकीसाठी पक्षाचे कार्यकर्ते तन-मन-धानाने काम करत आहे. पक्षाने आपणावर दिलेली जबाबदारी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पार पडू, असा विश्वास व्यक्त केला.

———-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *