सुषमा अंधारेला ठोकणारच ! मनसेच्या महिला आघाडी अनिता दिघे व शिवसेनेच्या महिला आघाडीच्या स्मिता अष्टेकर या रणरागिणीनी केले आवाहन



मीडियाचा लक्ष आपल्याकडे वेधण्यासाठी त्यांनी हा स्टंट केला असावा अशी टीका सुषमा अंधारे यांनी केली.


अहमदनगर

शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांची मुक्त संवाद यात्रा अहमदनगर जिल्ह्यामध्ये आली असून. या यात्रे दरम्यान त्यांनी भाजी विक्रेते, दुध व्यवसायिक तसेच नागरिकांशी संवाद साधला.त्यानंतर सुषमा अंधारे यांनी अहमदनगर जिल्हा न्यायालयमध्ये वकील बांधवांबरोबर चर्चा करण्यासाठी गेल्या असता  त्यांना मनसेच्या महिला आघाडीच्या अनिता दिघे व शिवसेनेच्या महिला आघाडीच्या स्मिता अष्टेकर यांच्या विरोधाचा सामना करावा लागला आहे.
त्यामुळे जिल्हा न्यायालय मध्ये काही काळ गोंधळ उडाला.मनसेच्या महिला पदाधिकारी अनिता दिघे आणि शिवसेनेच्या माजी महिला जिल्हा प्रमुख स्मिता अष्टेकर यांनी सुषमा अंधारे यांच्या अंगावर धावून जात न्यायालयातून बाहेर काढण्यासाठी  गोंधळ घातला.सुषमा अंधारे यांनी शिवसेनेत येण्यापूर्वी केलेल्या भाषणांत हिंदू देव-देवतांबद्दल अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन टीका केली होती तसेच उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेवर अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन टीका केल्या चे व्हिडिओ सोशल मीडिया वर पहायला मिळाले.

तरी देखील शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी सुषमा अंधारे यांना शिवसेनेत उपनेतेपद दिल्याने संतापलेल्या शिवसैनिक स्मिता अष्टेकर यांनी त्यांच्या अंगावर चप्पल फेकण्याचा प्रयत्न केला.मात्र  पोलिसांनी त्यांना पकडल्यामुळे पुढील अनर्थ टाळला.हा संपूर्ण गोंधळ तब्बल तासभर सुरू होता, शेवटी पोलिसांनी मध्यस्थी करत सुषमा अंधारे यांना न्यायालयाच्या बाहेर आणले तरी देखील स्मिता अष्टेकर या सुषमा अंधारे यांच्या अंगावर धावून जात होत्या.दरम्यान यावेळी सुषमा अंधारे यांना शिवीगाळ देखील करण्यात आली, मात्र आपण शिवीगाळ ऐकली नसल्याचं अंधारे यांनी म्हटलं आहे. तर मनसे पदाधिकाऱ्यावर टीका करताना त्यांचा कुठलातरी पक्ष आहे असं म्हणत मीडियाचा लक्ष आपल्याकडे वेधण्यासाठी त्यांनी हा स्टंट केला असावा अशी टीका सुषमा अंधारे यांनी केली.
या संपूर्ण गोंधळामुळे जिल्हा न्यायालयातील कामकाज एक तास ठप्प झाले होते व न्यायालयाच्या आवारामध्ये बघ्यांची गर्दी जमली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *