भिंगार अर्बन बँकेच्या चेअरमनपदी अनिलराव झोडगे तर व्हाईस चेअरमनपदी किसनराव चौधरी यांची बिनविरोध निवड



     नगर –

भिंगार येथील भिंगार अर्बन को-ऑप बँकेच्या नुकत्याच झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत अनिलराव झोडगे व किसनराव चौधरी यांच्या नेतृत्वाखालील भृंगऋषी पॅनेलने निर्वावाद यश संपादन केल्यानंतर आज बँकेच्या सभागृहात जिल्हा उपनिबंधक गणेश पुरी यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळाच्या बैकीत चेअरमन – व्हाईस चेअरमनपदाची निवडणुक झाली.

      यामध्ये चेअरमनपदासाठी अनिलराव झोडगे यांच्या नावाची सूचना संचालक नामदेव लंगोटे यांनी मांडली, त्यास तिलोत्तमा करांडे यांनी अनुमोदन दिले. तर व्हाईस चेअरमनपदासाठी किसनराव चौधरी यांच्या नावाची सूचना राजेंद्र पतके यांनी मांडली, त्यास एकनाथराव जाधव यांनी अनुमोदन दिले. सर्वांनुमते ही निवड बिनविरोध करण्यात आली.

     यावेळी बँकेचे संचालक विष्णू फुलसौंदर, अमोल धाडगे, राजेंद्र पतके, एकनाथ जाधव, नामदेव लंगोटे, तिलोत्तमा करांडे, अनिता भुजबळ, माधवराव गोंधळे, महेश झोडगे, रुपेश भंडारी, कैलास दळवी, कैलास रासकर आदिंसह बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शशिकांत महाजन, उपनिबंधक कार्यालयातील अधिकारी अल्ताफ शेख उपस्थित होते.

     यावेळी नवनिर्वाचित चेअरमन अनिलराव झोडगे व व्हाईस चेअरमन किसनराव चौधरी यांचा जिल्हा उपनिबंधक गणेश पुरी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

     निवडीनंतर नुतन चेअरमन म्हणाले, भिंगार अर्बन बँकेच्या सभासदांनी मोठ्या विश्‍वासाने आमच्या पॅनेलला भरघोस मतदान करुन निवडून दिले. आज सर्वानुमते आपली चेअरमनपदी निवड झाली आहे. भिंगार बँकेला मोठी परंपरा लाभलेली आहे, सभासद, संचालक, खातेदार, ठेवीदार यांच्या विश्‍वासास पात्र राहून बँकेचा कारभार आम्ही सांभाळू. बँकेचा लौकिकात भर टाकण्याचे काम आम्ही सर्व करु. आधुनिकतेचा स्विकार करत बँकेची यापुढेही प्रगतीची घौडदौड अशीच सुरु राहील, अशी ग्वाही दिली.

     याप्रसंगी नूतन व्हाईस चेअरमन किसनराव चौधरी म्हणाले, सभासदांनी आमच्यावर टाकलेला विश्‍वास बँकेच्या प्रगतीतून दाखवून देऊ. आता निवडणूक संपली आहे. सर्वांनी केलेल्या सहकार्य हेच बँकेच्या प्रगतीचे शिल्पकार असल्याचे सांगितले.

     यावेळी जिल्हा उपनिबंधक गणेश पुरी यांचा चेअरमन अनिलराव झोडगे व व्हाईस किसनराव चौधरी यांनी सत्कार केला तर अल्ताफ शेख यांचा सत्कार अमोल धाडगे व विष्णू फुलसौंदर यांनी केले. सूत्रसंचालन नामदेव लंगोटे यांनी केले तर आभार विष्णू फुलसौंदर यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *