आज अहमदनगर मध्ये ओबीसी महाएल्गार मेळावा

मेळाव्यास मोठा पोलीस बंदोबस्त तैनात
अहमदनगर
आज अहमदनगर मध्ये ओबीसी महाएल्गार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून.मराठा अरक्षणाचा अध्यादेश निघाला ल्या नंतर चार हा पहिलाच ओबीसी महाएल्गार मेळावा असून.या मेळाव्यास मंत्री छगन भुजबळ, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार राम शिंदे, लक्ष्मण हाके ओबीसी नेते, महादेव जानकर व अनेक ओबीस नेत्यांच्या उपस्थितीत हा महा यलगार मेळावा होत असून या महालगार मेळाव्यात आज मंत्री छगन भुजबळ काय घोषणा करणार याकडे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार असून सर्व ओबीसी बांधवाचं याकडे लक्ष लागलेला आहे.
या मेळाव्यास दोन ते तीन लाख ओबीसी बांधव उपस्थित राहणार असल्याची माहिती ओबीसीचे नियोजन समितीच्या सदस्यांनी दिली असून मोठा पोलीस बंदोबस्त देखील यावेळी तैनात करण्यात आला आहे.या मध्ये. ओबीसी मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात असणार आहे यात 4 डीवायएसपी, 14 पीआय, 34 एपीआय,300 पोलीस कर्मचारी , 25 महिला पोलीस कर्मचारी आणि एक आरसीबी प्लाटूनचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे… बरोबर पार्किंगच्या ठिकाणी देखील वेगळा पोलीस बंदोबस्त ठेवला जाणार असल्याची माहिती पोलीस विभागाकडून देण्यात आली आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *