वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्र्यांना मिळाले ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंचे आशीर्वाद

राळेगणसिद्धी अहमदनगर : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उद्या ९ फेब्रुवारी रोजी वाढदिवस आहे. या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मुख्यमंत्र्यांना फोन करत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. “हा तुमचा ६० वा वाढदिवस आहे, मात्र तुम्हाला शताब्दी साजरी करताना आम्हाला बघायचं आहे. सध्या लोकसंख्या वाढत चालली आहे आणि या वाढत्या लोकसंख्येत काम करण्यासाठी समाजाला तुमच्यासारख्या चांगल्या…

Read More

कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी खा. सुजय विखेंनी घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट

निर्यातबंदी उठवणे किंवा नाफेड मार्फत कांदा खरेदी करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा: खा. डॉ. सुजय विखे पाटील कांदा प्रश्नी अमित शाह यांच्या माध्यमातून लवकरच मार्ग निघेल; खा.सुजय विखे पाटील यांची माहिती दिल्ली: खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिल्ली येथे केंद्रीय गृहमंत्री अमितभाई शाह यांची भेट घेऊन कांदा निर्यात बंदी उठवण्यासंदर्भात आणि शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी…

Read More

अहमदनगर जिल्ह्यातील बेलवंडी गावात ६१८ एकर मध्ये उभारली जाणार उद्योग नगरी

मुंबई आज मुंबई येथे राज्याचे महसूल मंत्री श्री. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षेखाली व उद्योगमंत्री उदय सांमत यांच्या प्रमुख उपस्थितीत अहमदनगर जिल्ह्याच्या दृष्टीने महत्त्वाची बैठक संपन्न झाली.
यावेळी जिल्ह्यातील बेलवंडी ता. श्रीगोंदा येथील शेती महामंडळाच्या ६१८ एकर जमिनीवर एमआयडीसी उभारण्याला तत्वतः मान्यता देण्यात आली आहे.

सदर एमआयडीसीच्या आराखड्यासंदर्भात पाहणी व सर्वेक्षण लवकरात लवकर पूर्ण करून त्या संबंधित सर्व कामे काल मर्यादेत करण्यात यावीत असे निर्देश महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी यावेळी अधिकारांना दिले.

एमआयडीसी सुरू करण्यासंदर्भात मोजणीचा अहवाल मागविण्यात आला आहे. पुढील प्रकियेस गती देण्यात येणार असून, तात्काळ हे काम पुर्ण करण्यात येणार असल्याची माहिती उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिली. तसेच, जिल्हाधिकारी यांनी आजच उद्योग विभागाकडे विनंती प्रस्ताव सादर करावा असेही त्यांनी यावेळी सांगितले.

श्रीगोंदा तालूक्यातील बेलवंडी फार्म येथे शेती महामंडळाची मौजे पर्वतवाडी आणि महादेववाडी येथील ६१८ एकर जमीन उद्योग विभागला देण्याची तत्वत: मान्यता यावेळी देण्यात आली. या एमआयडीसी करिता खासदार डॉ. सुजय विखे पाटील आणि माजी मंत्री आमदार बबनराव पाचपुते यांनी पाठपुरावा केला होता. उद्योगनगरीसाठी जमीन दिल्याने खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी राज्याचे महसूल मंत्री श्री. राधाकृष्ण विखे पाटील आणि उद्योगमंत्री श्री. उदय सांमत यांचे आभार व्यक्त केले.

खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांनी सांगितले की बेलवंडी मध्ये रस्ते वाहतूक, पाणी तसेच रेल्वे वाहतुक सुविधा उपलब्ध तर आहेच शिवाय शिर्डी, पुणे आणि नाशिक एमआयडीसी केंद्र नजीक असल्याने येणाऱ्या काळात बेलवंडी उद्योजकांना मोठी पर्वणीच ठरणार आहे.
या एमआयडीसी मुळे जिल्ह्यात उद्योगाला चालना मिळून मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

दरम्यान, श्रीरामपूर तालुका व राहता तालुक्यातील शेती महामंडळाकडे असलेल्या जमिनीच्या समस्यांबाबत चर्चा करण्यात आली. खंडकरी शेतकऱ्यांना वाटप केलेल्या जमिनींचा भोगवटादार वर्ग / मधुन भोगवटादार वर्ग १ करणे तसेच सार्वजनिक प्रयोजनार्थ शेती महामंडळाची जमीन वाटप करणे संदर्भातील कामांचा आढावा मंत्री विखे पाटील यांनी घेतला.

सदर बैठकीत खासदार डॉ. सुजय विखे पाटील, माजी मंत्री आमदार श्री.बबनराव पाचपुते, महसूल विभागाचे अप्पर सचिव श्री. राजगोपाल देवरा, अहमदनगरचे जिल्हाधिकारी श्री.सिद्धराम सालीमठ, शेती महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक श्री. विश्वजित माने यांच्यासह महसूल आणि शेती महामंडळ पुणे यांचे अधिकारी उपस्थित होते.

Read More

निळवंडे उजव्या कालव्यातून पाणी सोडण्याचा निर्णय ऐतिहासिक -सौ. धनश्री विखे पाटील

राहुरी अहमदनगर
उत्तर नगर जिल्ह्याला वरदान ठरणाऱ्या निळवंडे उजव्या कालव्यातून पाणी सोडण्याचा निर्णय लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांकरीता निश्चितच ऐतिहासिक आणि आनंदाचा क्षण असल्याचे प्रतिपादन रणरागिणी महिला मंडळाच्या अध्यक्षा धनश्री सुजय विखे पाटील यांनी केले.

निळवंडे उजव्या कालव्यामुळे शेतकरी नक्कीच सुखावेल असा विश्वास व्यक्त करून राज्यातील महायुती सरकारमुळे धरणाच्या दोन्ही कालव्याच्या कामाला गती मिळून पाणी सोडण्याच्या निर्णय शेतकऱ्यांच्या उज्वल भविष्यासाठी महत्वपूर्ण ठरणारा असल्याचे त्यांनी सांगितले.

उत्तर नगर जिल्ह्यासह राहुरी तालुक्यासाठी वरदान असणारे निळवंडे धरणाच्या उजव्या कालव्याचे तांभेरे,कानडगाव, निंभेरे, तुळापूर, तांदूळनेर,वडनेर,कनगर,चिंचविहरे ,गुहायेथे जलपूजन रणरागिणी महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ धनश्रीताई विखे पाटील व जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष शिवाजी राव कर्डीले यांच्या हस्ते करण्यात आले.

धनश्री विखे यांनी सांगितले की जिल्ह्याच्या विकासासाठी महसूलमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील आणि खा.डॉ सुजय विखे पाटील सदैव प्रयत्नशील आहेत त्यांनी केलेल्या विकास कामामुळे जिल्ह्याचा विकास होत असल्याचे स्पष्ट करून,
निळवंडे कालवा व्हावा ना. विखे पाटील यांचा पाठपुरवा महत्वपूर्ण ठरला असल्याचे सौ.विखे म्हणाल्या.
यावेळी भाजपचे तालुका अध्यक्ष सुरेश बानकर, जिल्हा उपाध्यक्ष अमोल भनगडे,रवींद्र म्हसे, भिमराज हारदे, नानासाहेब गागरे,डॉ बापूसाहेब मुसमाडे, सरपंच निशा गागरे,उत्तम राव मुसमाडे,संदीप गीते,मारुती नालकर,सर्जेराव गाडगे, संदिप गाडगे ,आणा पाटील बलमे, बबनराव कोळसे,विजय बलमे, यांच्या सह सर्व व पदाधिकारी ,अधिकारी व ग्रामस्थ उपस्तीत होते.

Read More

शरद पवारांच घड्याळ अजित पवारांच्या हातात,
शरद पवारांना मोठा धक्का, निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय!

अहमदनगरकाँग्रेस मधून बाहेर पडून ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी स्थापन केलेल्या राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळ चिन्हाचा निवडणूक आयोगाने धक्कादायक निर्णय दिला असून.राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळ चिन्ह उपमुख्यमंत्री अजित पवार यांचेच आहे असा महत्त्वाचा निर्णय आज निवडणूक आयोगाने दिला. जुलै महिन्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडली. तत्कालीन विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सत्ताधारी महायुतीबरोबर जात उपमुख्यमंत्री…

Read More

शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख आनंद लहामगे यांच्या निवासस्थानी रासपचे महादेव जानकर यांची सदिच्छ भेट

विविध राजकीय, सामाजिक विषयांवर चर्चा मराठा समाजाला स्वतंत्र विशेष आरक्षण मिळाले पाहिजे, हीच सर्व पक्षाची भूमिका होती. ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देणार असल्याचे सरकार सांगत असले तरी त्यातूनच आरक्षण देण्याचे काम सुरू आहे. यामुळे ओबीसींच्या न्याय हक्कावर गदा येत आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध नसून, ओबीसींच्या हक्कावर गदा येता कामा नये,…

Read More

आमदार रोहित पवार यांच्यावर ईडीच्या चौकशीचा राष्ट्रवादी काँग्रेस कडून तीव्र विरोध. 

             लोकशाहीमध्ये लोकांचे प्रश्न मांडणाऱ्या नेत्याविरोधात कारवाई केली जात असल्याचा आरोप- अभिषेक कळमकर        चोर सोडून संन्याशाला फाशी देण्याचा सत्याधाऱ्यांचा प्रकार.       अहमदनगर                                                         राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते आमदार रोहित पवार यांच्यावर ईडी मार्फत होणाऱ्या चौकशीच्या विरोधात अहमदनगर जिल्हा व शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने निषेध व्यक्त करून जिल्हाधिकारी कार्यालय येथे घंटानात आंदोलन करून निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र…

Read More